सलमानचा तो टॉवेल विकला गेला सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खानच्या 'जीने के हैं चार दिन' टॉवेलचा लिलाव 1,42,000 रुपयांना झाला. ही किंमत अनेकांसाठी आश्चर्य करणारी आहे. पण, वास्तविकता अशीही आहे की, ज्याला सलमान खान आवडतो तो त्याच्याशी संबंधित गोष्टी कोणत्याही किंमतीला खरेदी करण्यास तयार असतो. त्यामुळं त्याच्या अशा एखाद्या चाहत्यानं तो टॉवेल लिलावात खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. हे वाचा - Amazonच्या नव्या CEOची मोठी घोषणा! जगभरातील 55,000 लोकांना देणार जॉब साजिद नाडियाडवाला निर्मित 'मुझसे शादी करोगी' हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. अमरीश पुरी, कादर खान, सतीश शाह आणि राजपाल यादव यांनीही चित्रपटात काम केले होते. हे वाचा - VIDEO : ऑनलाइन बैठकीदरम्यान मुलाने केलं असं कृत्य; महिला मंत्रीला सर्वांसमोर मागावी लागली माफी सलमान खान अलीकडेच रशियामध्ये कॅटरिना कैफसोबत 'टायगर - 3' चे शूटिंग करत होता. यानंतर, असे वृत्त समोर आले की, शूटींग तुर्कीला हलवले गेले आहे. त्याची चांगली मैत्रिण युलिया वंतूर देखील इस्तंबूलमध्ये त्याच्यासोबत आहे. अभिनेता इम्रान हाश्मी देखील 'टायगर 3'चा एक भाग आहे आणि त्याचा लूक इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर सलमान खानचा भाचा आणि सोहेल खानचा मुलगा निरवान खान हेही रशियामध्ये सलमान खानसोबत दिसले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Priyanka chopra, Salman khan