Radhe साठी सलमान खानने मोडला आपलाच नियम, दिशा पटानीला केलं KISS; VIDEO पाहून थक्क झाले चाहते

Radhe साठी सलमान खानने मोडला आपलाच नियम, दिशा पटानीला केलं KISS; VIDEO पाहून थक्क झाले चाहते

‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’चा (Radhe : your most wanted bhai) ट्रेलर अखेर प्रदर्शित (Radhe trailer released) झाला आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरने इंटरनेटवर धूमाकूळ घातला आहे.

  • Share this:

मुंबई 22 एप्रिल :  भाईजानचा अर्थात अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’चा (Radhe : your most wanted bhai)  ट्रेलर अखेर प्रदर्शित (trailer released) झाला आहे. काही तासांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरने इंटरनेटवर धूमाकूळ घातला आहे. पण हा ट्रेलर सर्वाधिक चर्चेत आहे तो म्हणजे एका किसमुळे. सलमान खानने नो ऑनस्क्रिन किसचा (Salman khan kisses onscreen) आपलाच नियम मोडला आहे. फिल्ममध्ये त्याने दिशा पटानीला (Disha Patani) किस केलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

राधे फिल्ममध्ये सलमान खानसह अभिनेत्री दिशा पटानी, जॅकी श्रॉफ (Jacky Shroff), रणदीप हुडा (Randeep Hooda) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या फिल्मसाठी  सलमाने त्याची ऑनस्क्रिन नो किस ही पॉलिसी तोडली आहे आणि अभिनेत्री दिशाला किस केलं आहे. ट्रेलरमध्ये  सलमान आणि दिशा एकमेकांना किस करत आहे असा सिन आहे. त्यामुळे सलमानच्या ऑनस्क्रिन किसची फारच चर्चा रंगली आहे.

आजवर सलमानने कोणत्याही चित्रपटात ऑनस्क्रिन किस केलं नव्हतं. एका मुलाखतीत त्याने यावर भाष्य करत किस हा चित्रपटासाठी महत्त्वाचा नाही, असं म्हटलं होत. पण आता सलमानने त्याचे नियम बदलल्याचं दिसतं आहे. सलमानचे लाखो चाहते हे जगभरात आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरनंतर सलमानच्या या किसविषयी त्याचे चाहते मत व्यक्त करत आहेत.

हे वाचा - विनाकारण ट्रोल करणाऱ्या युजरला वरुण धवनने दिलं सडेतोड उत्तर

येत्या ईदला ही फिल्म (Eid 2021) म्हणजेच 13 मे 2021 ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. झी फाय (Zee5) या प्लॅटफॉर्मच्या झी प्लेक्स (zee plex) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट दिसणार आहे.  ओटीटीसह अन्य प्लॅटफॉर्मवर जगभरात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. DTH ऑपरेटर म्हणजेच डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल यावरही चित्रपट पाहता येणार आहे. यामुळे प्रेक्षकांना आपल्या घरातच सुरक्षितरित्या चित्रपट पाहता येणार आहे.

Published by: News Digital
First published: April 22, 2021, 6:14 PM IST

ताज्या बातम्या