सलमान खान करणार स्वतःहून 29 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स?

सलमान खान करणार स्वतःहून 29 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स?

सलमानचा 'दबंग 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानंतर तो आता स्वतःहून 29 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 2 डिसेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये बिग बजेट सिनेमांची चलती आहे. एका मागोमाग नव्या सिनेमांच्या घोषणा होताना दिसत आहेत. या नव्या सिनेमांमध्ये अनेक नव्या जोड्या दिसणार आहेत. अशातच आता आणखी एका बिग बजेट सिनेमाची चर्चा सुरू आहे. ज्यात सारा अली खान अभिनेता सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार असण्याच्या शक्यता आहेत. असं झालं तर हा सिनेमा सारा-सलमानचा पहिला सिनेमा असणार आहे. या सिनेमासाठी सारानं सिनेमाच्या मेकर्सची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.

बॉलिवूड पदार्पणानंतर सारा अली खानचं करिअर जोरावर आहे. पहिल्याच सिनेमात तिनं मोस्ट टॅलेंटेड अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत स्क्रीन शेअर केली. त्यानंतर दुसऱ्या सिनेमात ती रणवीर सिंहसोबत रोमान्स करताना दिसली. त्यानंतर आता दबंग खानसोबत काम करण्याची तयारी सुरू आहे. स्पॉटबॉय-ईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमात सारा अली खान आमि सलमान खान स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. यासाठी नुकतीच तिनं निर्मात्यांची भेट घेतली. तसेच तिनं आनंद एल राय यांना या सिनेमात तिला घेण्यासाठी विनंती केली आहे.

लिव्ह- इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या या 7 जोड्यांनी दुसऱ्यांशी केलं लग्न

याशिवाय डेक्कन क्रॉनिकल यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आनंद एल राय यांनी सुरुवातीपासूनच सलमान खानला त्यांच्या सिनेमात घेण्याची तयारी करत होते. त्यानंतर आता या सिनेमाची हिरोईन म्हणून सारा अली खानचं नाव पुढे येत आहे. मात्र या सर्व शक्यता असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही तसेच सिनेमाचं नावही अजून गुलदस्त्यात आहे.

काय आहे सनी लिओनीच्या हाॅट फिगरचं गुपित, जाणून घ्या तिचा Diet Plan

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर लवकरच त्याचा 'दबंग 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर दुसरीकडे साराजवळही इम्तियाज अली यांचा ‘लव्ह आज कल 2’ आणि ‘कुली नंबर 1’चा रिमेक असे दोन सिनेमे आहेत. यातील ‘लव्ह आज कल 2’मध्ये ती कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे तर ‘कुली नंबर 1’च्या रिमेकमध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे.

Wedding Anniversary: 'या' व्यक्तीमुळे सुरू झाली होती निक-प्रियांकाची लव्हस्टोरी!

Published by: Megha Jethe
First published: December 2, 2019, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading