फिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल

फिटनेससाठी सलमान खाननं लढवली 'ही' शक्कल

भाईजान सलमान भारत या चित्रपटात पाच वेगवेगळ्या वयोगटातील भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या भूमिकेत सलमान दिसेल.

  • Share this:

मुंबई, 15 जानेवारी : बाॅलिवूडचा दबंग खान फिटनेससाठी काहीही करू शकतो. म्हणूनच 53 वर्षांचा सलमान खान 35 वर्षांचा दिसतो.  तो रोज जिममध्ये घाम गाळतो.

आता सलमानच्या भारत सिनेमाचं शूटिंग जोरात सुरू आहे. त्यासाठी त्याला जिमला जाणं शक्य होत नाहीय. त्यामुळे त्यानं एक शक्कल लढवलीय.

भारत सिनेमाच्या सेटवरच अतुल अग्निहोत्रीनं त्याला जिम करून दिलीय. ही जिम 10 हजार स्क्वेअर फुटात आहे. शूटिंगमधून वेळ काढून सलमान तिथे व्यायाम करतो.

भाईजान सलमान या चित्रपटात पाच वेगवेगळ्या वयोगटातील भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या भूमिकेत सलमान दिसेल. भारत हा चित्रपट कोरियन सिनेमा हिंदी रिमेक आहे. 'ऑड टू माय फादर' असं त्या चित्रपटाचं नाव आहे.

सिनेमाच्या कास्टिंगबद्दल याआधीसुद्धा माहिती देण्यात आली होती. अभिनेता जॅकी श्रॉफच्या भूमिकेचं नाव महाभारत असं आहे. सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ करताना दिसेल. भारतची पहिली बायको स्मृतीचा रोल अभिनेत्री तब्बू साकारणार आहे. चित्रपटातील महत्त्वाची बाब म्हणजे सलमान खान या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतची मुलगी राधाची भूमिका अभिनेत्री दिशा पाटनी करणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा रोमांस या सिनेमात पहायला मिळणार आहे.

एका मुलाखतीत कतरिना सलमानबद्दल मनमोकळं बोलली आहे. ती म्हणाली, ' सलमान माझा खूप चांगला मित्र आहे आणि तसाच राहील. आम्ही अनेक महिने एकमेकांशी बोलत नाही, भेटत नाही. पण मी कधी खूप अपसेट असते, तेव्हा तो नेमका माझ्या समोर येऊन उभा राहतो. त्याला कसं कळतं कोण जाणे!'

Kasautii zindagi Kay 2 : अनुरागच्या जवळ येण्यासाठी कोमलिकानं सुरू केलं प्लॅनिंग

First published: January 15, 2019, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading