सलमाननं 'लव्हरात्री'चं नाव बदललं आणि वाद थांबवला

सलमाननं 'लव्हरात्री'चं नाव बदललं आणि वाद थांबवला

सलमान खानचा सिनेमा 'लवरात्री'च्या नावावर बरेच वाद सुरू आहेत. मुजफ्फरनगर कोर्टात तर या सिनेमाविरोधात याचिकाही दाखल केलीय.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : सलमान खानचा सिनेमा 'लवरात्री'च्या नावावर बरेच वाद सुरू आहेत. मुजफ्फरनगर कोर्टात तर या सिनेमाविरोधात याचिकाही दाखल केलीय. सलमानची बहीण अर्पिताचा नवरा आयुष शर्माचा हा पहिलाच सिनेमा. त्यामुळे जास्त वाद होऊ नयेत म्हणून सलमाननं सिनेमाचं नावच बदललं.

त्याने तसं ट्विटही केलंय. आता या सिनेमाचं नाव 'लव्हयात्री' आहे. ट्विट करताना सलमान म्हणालाय, ही स्पेलिंग मिस्टेक नाहीय. लव्हयात्रीचं प्रमोशन सोशल मीडियावरच होत होतं.

काही दिवसांपूर्वी सलमानने एक ट्विट केलं होतं. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांनी जोर धरला होता...'मुझे लडकी मिल गयी,' असं ट्विट करत सल्लू मियाने चौकार मारला होता आणि ट्विटरवर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली.सलमान खान लग्न करतोय की काय याबद्दल कुतूहल वाढलं असताच सलमानने थोड्याच वेळात दुसरं ट्विट केलं. आणि या सर्व अफवांवर पूर्णविराम मिळाला.

सिनेमासाठी अभिनेत्रीचा शोध इतके दिवस सुरू होता. अखेर कॅडबरी गर्ल वारिना हुसेन हिची या सिनेमासाठी वर्णी लागली.

सलमान सध्या बिग बाॅसमध्ये बिझी आहेच. शिवाय टाइम्स आॅफ इंडियाच्या बातमीनुसार संजय लीला भन्साळी सलमानला घेऊन इन्शाल्ला सिनेमा करतोय. हा सिनेमा 2020मध्ये रिलीज होईल. संजय लीला भन्साळीसोबत सलमाननं हम दिल दे चुके सनम, खामोशी हे सिनेमे केले होते. आता पुन्हा 10 वर्षांनी सलमान भन्साळीबरोबर काम करेल.

भारत'चा एक पहिला फोटो बाहेर आलाय. त्यात सलमानच्या बाहुपाशात कतरिना आहे. खुद्द सलमाननं हा फोटो ट्विट केलाय. सिनेमाचं शूटिंग माल्टा इथे सुरू आहे. दोघंही भारतीय पोशाखात आहेत. ते एकमेकांसोबत खूप सुंदर दिसतायत.

First published: September 19, 2018, 11:34 AM IST

ताज्या बातम्या