सलमाननं आणली नवीन इलेक्ट्रिक सायकल

सलमाननं आणली नवीन इलेक्ट्रिक सायकल

जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सलमान खानने 'बिंग ह्युमन' च्या नवीन इलेक्ट्रिक सायकल्स लॉंच केल्या आहेत.या सायकल्सची किंमत 40,000पासून चालू होते आहे.

  • Share this:

06 जून : जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून   सलमान खानने 'बिंग ह्युमन' च्या नवीन इलेक्ट्रिक सायकल्स लॉंच केल्या आहेत.या सायकल्सची किंमत 40,000पासून चालू होते आहे.  सगळ्यात टाॅपची सायकल  57000 रूपयांची आहे.

आता सायकल्स तर भरपूर येतात. मग या सायकल्समध्ये असं 'डिफरन्ट'  काय ? डिफरन्ट हे आहे की या सायकल्स एका बॅटरी पॅकच्या  मदतीने चालवता येतील. पण खरी गोम अशी की हा बॅटरी पॅक  सायकलमध्येच असणार आहे.

एक बटन दाबायचा अवकाश, ते दाबलं की या सायकलचं स्पेशल रायडिंग मोड सुरू होईल. हे रायडिंग मोड खडी चढणं सुकर करणार आहे.तसंच या रायडिंग मोडमुळे चालकाला दमही कमी लागेल .या सायकल्सचं कंपनीने तब्बल दीड वर्ष परीक्षण केलंय. आता बघू ह्या ,या सायकल्स बाजारात धावतात की पडतात ते...

First published: June 6, 2017, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading