VIDEO : मध्यरात्री गर्लफ्रेंड यूलिया वंतूर सोबत मुंबईच्या रस्त्यावर सलमानची सायकल राइड

VIDEO : मध्यरात्री गर्लफ्रेंड यूलिया वंतूर सोबत मुंबईच्या रस्त्यावर सलमानची सायकल राइड

सलमान-कतरिनामध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढत असतानाच आता कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जून : भारत सिनेमामुळे अभिनेता सलमान खान मागच्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रत्येक प्रमोशन इव्हेंटमध्ये सलमान अभिनेत्री कतरिना कैफचं कौतुक करताना दिसला. त्यामुळे सलमान आणि कतरिना यांच्यामध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढत असल्याचं असतानाच आता कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत सलमानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलमान आणि यूलिया एकत्र सायकल राइडवर निघालेले दिसत आहेत.

VIDEO : मराठीतील आत्तापर्यंतचं सगळ्यात बोल्ड गाणं रिलीज

मीडिया रिपोर्टनुसार सलमान खान त्याची गर्लफ्रेंड यूलिया वंतुर आणि मलायका-अरबाजचा मुलगा अरहान खान यांच्यासोबत मंगळवारी (11 जून) मध्यरात्री 2.30 वाजता सायकल राइडसाठी निघाला होता आणि काही वेळानंतर तो पुन्हा गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये परतला. सलमानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. भाईजानचा हा स्पोर्टी अंदाज त्याच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरला आहे. तसं पाहिलं तर असं मुंबईच्या रस्त्यावर सायकल राइड करण्याची पहिलीच वेळ नाही या अगोदरही अनेकदा तो अशाप्रकारे मुंबईमध्ये सायकल राइड करताना दिसला होता.

'इन्शाअल्लाह'नंतर 'हा' महत्त्वाचा मुद्दा भन्साळी साकारणार मोठ्या पडद्यावर

सलमान खान सध्या ‘भारत’ला मिळालेल्या यशाचा आनंद लुटत आहे. या सिनेमानं अवघ्या 7 दिवसात 167 कोटींचा गल्ला जमवला आहे. या सिनेमाची फक्त भारतातच नाही तर परदेशातही नॉन स्टॉप कमाई सुरू आहे. नुकतच 1947 च्या प्रत्यक्षदर्शींसाठी सलमान आणि कतरिनानं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. यावेळी ते त्या सर्वांना भेटले सिनेमाविषयी त्यांच्याशी चर्चा केली.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरची लेक करतेय ‘या’ व्यक्तीला डेट

याशिवाय इंग्लंडमध्ये वर्ल्ड खेळण्यासाठी गेलेल्या टीम इंडियानंही नॉटिंगहॅममध्ये ‘भारत’ सिनेमा पाहिला. या सिनेमामध्ये सलमान-कतरिना व्यतिरिक्त दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, तब्बू, सुनील ग्रोवर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

===================================================================================

Big Boss मराठीच्या घरात होणार सलमानची एन्ट्री? ऐका काय म्हणाला भाईजान

First published: June 13, 2019, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading