मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Salman Khan: प्रसिद्ध अभिनेत्रीनं उलगडलं सलमान खानचं 'ते' गुपित; म्हणाली 'तो रात्री सिनेमाच्या सेटवर...'

Salman Khan: प्रसिद्ध अभिनेत्रीनं उलगडलं सलमान खानचं 'ते' गुपित; म्हणाली 'तो रात्री सिनेमाच्या सेटवर...'

सलमान खान

सलमान खान

अभिनेत्यामुळे आज अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. पण आता त्याच्याबद्दल 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रीने मोठा खुलासा केला होता. काय म्हणाली होती ती नक्की जाणून घ्या...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 एप्रिल : सलमान खान अनेक वादग्रस्त प्रकरणात अडकलेला असला तरी तो अनेकदा आपल्या चांगल्या स्वभावाने लोकांची मने जिंकतो. समाज कार्य करण्यापासून तो कधीही मागे हटत नाही. सलमान खानने बॉलिवूडमध्येही अनेक नवोदित अभिनेत्रींना मोठे प्रोजेक्ट देत पदार्पणासाठी मदत केली आहे. अभिनेत्यामुळे आज अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. त्याच्या या दिलदारपणामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. पण आता त्याच्याबद्दल 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रीने मोठा खुलासा केला होता. काय म्हणाली होती ती नक्की जाणून घ्या...

आयशा जुल्का ही बॉलिवूडची प्रसिद्ध स्टार आहे. तिच्या अभिनय कौशल्यासोबतच ती तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाते. तिने साकारलेल्या प्रत्येक भूमिका गाजायच्या. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. आयशाने सलमान खानसोबतच आपल्या करिअरची सुरुवात केली होती. तेव्हा सलमान खानसोबत तिची मैत्री कशी होती, सलमान खान सेटवर नेमकं काय करायचा याविषयी अभिनेत्रीने अनेक गुपितेही उघड केली. सलमानबाबत एक प्रसंग सांगताना तिने एक चांगला अभिनेता असण्यासोबतच चांगला माणूसही आहे असं सांगितलं होतं.

Shahrukh Khan: शाहरुख खानच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये तैनात आहेत लेडी बॉडीगार्ड्स; कारण वाचून कराल सलाम

आयशा झुल्काने मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला आहे. या मुलाखतीत तिने सलमान खानच्या दातृत्वाचे अनेक किस्से सांगितले. 1991 मध्ये आलेल्या 'कुर्बान' या चित्रपटाच्या सेटवर घडलेला एक प्रसंग तिने सांगितला होता. या चित्रपटाद्वारे तिने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने सलमान खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने सांगितले होते की, 'या सिनेमाच्या शुटिंगवेळी सलमान सेटवर उरलेले अन्न वाया जाऊ द्यायचा नाही. तो नेहमी ते अन्न भुकेल्यांमध्ये वाटायचा. शूटिंगवरून घरी जातानाही ते उरलेले अन्न पॅक करायचे आणि वाटेत गरजूंना खाऊ घालायचे.'

आयशाने 90 च्या दशकात एक सो एक हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या करिअरमध्ये तिने 'खिलाडी', 'जो जीता वही सिकंदर', 'बलमा', 'रंग' आणि 'वक्त हमारा है' सारखे अनेक यशस्वी चित्रपट केले आहेत. या चित्रपटांमध्ये तिने साकारलेली व्यक्तिरेखाही अतिशय दमदार आहेत. आयशा झुल्का ही बॉलिवूडमधील टॉप आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक होते. अनेक वर्षांपूर्वी तिने बॉलिवूड सोडले आणि ती बिझनेस वुमन बनली. त्यानंतर ती बर्‍याच दिवसांनी ओटीटीवर परतली आणि ती अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर 'हुश हुश'मध्ये दिसली. या वेब सिरीजमध्ये सोहा अली खान, जुही चावला, कृतिका कामरा, शहाना गोस्वामी आणि करिश्मा तन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

First published:
top videos

    Tags: Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Salman khan