मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'या वयात रोमान्स करताना लाज वाटत नाही का?' सलमान खाननं दिलं अजब उत्तर

'या वयात रोमान्स करताना लाज वाटत नाही का?' सलमान खाननं दिलं अजब उत्तर

‘निम्म्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना लाज वाटत नाही का?’; टीकारांच्या प्रश्नावर सलमान खाननं दिलं अजब उत्तर

‘निम्म्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना लाज वाटत नाही का?’; टीकारांच्या प्रश्नावर सलमान खाननं दिलं अजब उत्तर

‘निम्म्या वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना लाज वाटत नाही का?’; टीकारांच्या प्रश्नावर सलमान खाननं दिलं अजब उत्तर

    मुंबई 2 मे: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) ‘राधे: युवर मोस्ट वॉण्टेड भाई’ (Radhe Your Most Wanted Bhai) हा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा मिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सलमानच्या चाहत्यांनी ट्रेलरमधील अॅक्शन सीन पाहून अक्षरश: शिट्या मारल्या, तर दुसरीकडे टीकाकारांनी अभिनयावरुन जोरदार टोले मारले. मात्र या सर्वांमध्ये सलमान-दिशाचा किसिंग सीन प्रचंड चर्चेत असते. हा सीन पाहून 55 वर्षांचा सलमान 28 वर्षांच्या दिशासोबत कसा काय रोमान्स करु शकतो? हाच प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. अखेर वारंवार केल्या जाणाऱ्या या प्रश्नावर स्वत: भाईजाननं उत्तर दिलं आहे. राधे या चित्रपटात दिशा पटानी आणि जॅकलिन फर्नाडिंस या दोन अभिनेत्री झळकणार आहेत. दोन्ही अभिनेत्री सलमानच्या निम्मा वयाच्या आहेत. शिवाय सलमान वयाच्या 55 व्या वर्षी हिरोच्या भूमिकेत झळकतोय आणि तरुण अभिनेत्रींसोबत रोमान्स करतोय. त्याचा हा अंदाज काही प्रेक्षकांना आवडेला नाही. “तू वडिलांच्या वयाचा झाला आहेस, आता तू केवळ म्हाताऱ्याच्या भूमिका कर” असे टोले काही टीकाकार त्याला सातत्यानं लगावत आहेत. शिवाय ‘राधे’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील त्याचा किसिंग सीन पाहून आणखीनच त्याची खिल्ली उडवली जात आहे. अखेर या टीकाकारांना भाईजाननं त्याच्याच शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. अभिनेत्रीचं पाचव्यांदा ब्रेकअप; शेवटी एक्स बॉयफ्रेंडसोबतच पुन्हा थाटला संसार अलिकडेच राधे या चित्रपटाचा ऑफस्क्रीन व्हिडीओ अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आला. या BTS व्हिडीओमध्ये त्यानं टीकाकारांना उत्तर दिलं. तो म्हणाला, “मी दिशा किंवा जॅकलिन यांच्या वयाचा नाही तर त्या माझ्या वयाच्या आहेत. त्यामुळं असे प्रश्न मला पुन्हा विचारु नका.” राधे या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. कोरोनामुळं या चित्रपटाचं प्रदर्शन दोन वेळा लांबणीवर गेलं होतं. परंतु अखेर निर्मात्यांनी सिनेमागृहांसोबतच OTT प्लॅटफॉर्मवर देखील चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. राधे येत्या 13 मे रोजी ZEE Plex आणि ZEE 5 वर प्रदर्शित होणार आहे. “कोरोनामुळं सध्या घराबाहेर पडणं धोक्याचं आहे. शिवाय सलमानचा चित्रपट म्हटलं की लोक थिएटरमध्ये गर्दी करु शकतात. अन् सुरक्षेच्या दृष्टीनं गर्दी टाळण्यासाठी OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय आम्ही घेतला” असा दावा सलमान खाननं केला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood News, Disha patani, Entertainment, Salman khan

    पुढील बातम्या