मुंबई, 30 जून : टायगर झिंदा है नंतर सलमान-कतरीनाची जोडी धूम 4 मध्येही दिसणार अशी चर्चा आहे. धूम 3मध्ये आमीर खानसोबत कतरिनाची जोडी होती, त्यामुळे कतरिनासाठी धूमची सीरिज काही नवी नाही. सलमान खान धूम 4 करणार हे ठरल्यावर सलमान खानसोबत कतरिनाच्या नावाची वर्णी लागणं हे काही फार धक्कादायक नाही. कारण कतरिना ही सलमानची खास मैत्रीण आहे आणि सलमान-कतरिनाची ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकांना पहायला आवडते.
त्यामुळे यशराजनेही सलमान-कतरिना जोडीलाच प्राधान्य द्यायचं ठरवलेलं दिसतंय. सलमान-कॅटच्या चाहत्यांसाठी ही एक धमाल ट्रीट असू शकते. पण रेस-3 वर झालेली टीका पाहता यावेळी तरी सलमानने सिनेमाची कथा पाहूनच सिनेमा स्वीकारावा, असा सल्ला सलमानला सोशल मीडियावर अनेकांनी दिलाय.
सलमान आणि कतरिना यांचा एकत्र असा हा सहावा सिनेमा. आणि त्यांची केमिस्ट्री नेहमीच रंगते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dhoom 4, Katreena kaif, Ranveer sing, Salman khan, कतरिना कैफ, धूम-4, रणवीर सिंग, सलमान खान