VIDEO : हातात हात घालून पहिल्यांदा केला कतरिना-सलमाननं रॅम्पवाॅक

VIDEO : हातात हात घालून पहिल्यांदा केला कतरिना-सलमाननं  रॅम्पवाॅक

कतरिना आणि सलमानचं तसं नाहीय. ब्रेकअपनंतर ते चांगले मित्र राहिले कायमचे. म्हणूनच सलमानचा भारत संकटात आल्यावर त्याच्या मदतीला कतरिनाच धावून आली.

  • Share this:

मुंबई, 02 आॅगस्ट : सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी बाॅलिवूडमध्ये एव्हरग्रीन म्हणायला हवी. अनेकदा बाॅलिवूडमध्ये ब्रेकअप होऊन जोडपी एकमेकांची तोंडही पाहात नाहीत. ऐश्वर्या आणि सलमानचंच एक उदाहरण आहे. पण कतरिना आणि सलमानचं तसं नाहीय. ब्रेकअपनंतर ते चांगले मित्र राहिले कायमचे. म्हणूनच सलमानचा भारत संकटात आल्यावर त्याच्या मदतीला कतरिनाच धावून आली.

आता सलमान आणि कॅटनं मनीष मल्होत्राच्या फॅशन शोमध्ये रॅम्प वाॅक केला. हातात हात घालून. मनीष मल्होत्राचं हे पर्शियन कलेक्शन होतं. त्यासाठी दोघंही वधूवराच्या पोशाखात होते. सलमान खाननं काळी शेरवानी घातली होती. कॅटही नक्षीदार घागऱ्यात होती. दोघांची केमिस्ट्री कमाल वाटत होती नेहमीप्रमाणे. मनीष मल्होत्राच्या फॅशन शोला 13 वर्ष झाली. त्यानिमित्तानं त्यानं बाॅलिवूडची हिट जोडी घेतली होती.

#salmankhan #katrinakaif ❤️❤️❤️ @manishmalhotra05 @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

कतरिना कैफ भारतमध्ये आता प्रियांकाच्या जागी असणार आहे. सलमान खानने रात्री आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली. "एक सुंदर आणि सुशील मुलगी जिचं नाव आहे कतरिना कैफ...स्वागत आहे तुझं भारतच्या जीवनात" असं म्हणत सलमानने कतरीनाचा फोटो शेअर केला.

अली, सलमान आणि कतरिना तिघांनी एकत्र काम 'टायगर जिंदा है'मध्ये केलं होतं. सलमान-कॅट दबंग, एक था टायगर, मैने प्यार क्यूं किया अशा सिनेमांमध्ये एकत्र होते. सलमान आणि कतरिनाचं अफेअरही गाजलं होतं. सलमानला कतरिनाबद्दल साॅफ्ट काॅर्नर आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 11:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading