सलमान खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर, 2021 च्या ईदला 'कभी ईद कभी दिवाली'

सलमान खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर, 2021 च्या ईदला 'कभी ईद कभी दिवाली'

अभिनेता सलमान खान (Salman Khan)आणि प्रोड्यूसर साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala)यांचा नवीन चित्रपट कभी ईद कभी दिवाली (Kabhi Eid Kabhi Diwali)२०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जानेवारी : सल्लूमियॉंच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  2021मधल्या  ईदला दिवळीचाही आनंद मिळणार आहे. दरवर्षी ईदला नव्या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी दंबग खान घेऊन येत आहे एक खास चित्रपट. अभिनेता सलमान खान (Salman Khan)आणि निर्माता साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala)यांचा नवीन चित्रपट 'कभी ईद कभी दिवाली' (Kabhi Eid Kabhi Diwali) 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सांझी (Samji-Farhad)करणार आहे. फरहाद सांझी यांनी याआधी 'हाउसफुल 4' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर 2014 मध्ये आलेल्या किक या चित्रपटानंतर पुन्हा एकदा सलमान खान आणि साजिद नाडियादवाला एकत्र येत आहेत

2019 च्या ईदला प्रदर्शित होणार 'कभी ईद कभी दिवाली'

सलमान खानचे चाहते जे खास ईदनिमित्त त्याच्या चित्रपटाची वाट बघत असतात त्यांच्यासाठी 2021 च्या ईदचंही नियोजन सलमानने करून ठेवलं आहे.  2021 ची ईद ही सलमानच्या चाहत्यांसाठी असणार आहे खास ,कारण ईद आणि सलमान खानचं एक वेगळं नातं आहे. गेल्या काही वर्षांपासून सलमान खान खास ईदच्या दिवशी त्याचे काही चित्रपट प्रदर्शित करतो. त्यामुळे दरवर्षी सलमान खानच्या चाहत्यांना ईदला आपल्या भेटीला कोणता चित्रपट येणार याची उत्सुकता असते. 2019 च्या ईदला सलमान खानचा भारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  आता 2020 च्या ईदला सलमान खान चा राधे हा चित्रपट येणार आहे. तर तिथेच 2020 मध्येच सलमान खानने 2021 ची ईद देखील आपल्या नावावर केली आहे. 2021 मध्ये सलमान खान 'कभी ईद कभी दीवाली' हा चित्रपट घेऊन येत आहे. स्वत: सलमान खाननेच ट्विटरवरुन याची घोषणा केली आहे.

डिसेंबरमध्ये प्रभूदेवा दिग्दर्शित दबंग 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दबंग 3 नंतर आता पुन्हा एकदा प्रभूदेवा आणि सलमान खान ही जोडी राधे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. राधे या चित्रपटात सलमान खानसोबत दिशा पाटनी, रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ बघायला मिळणार आहेत.

-------------------------

चाहत्याच्या आगाऊपणामुळे सारा अली खान घाबरली , नेमकं काय घडलं पाहा VIDEO

Tanhaji रीलिज होताच JNU बद्दल बोलला अजय देवगण; नाव न घेता दीपिकाला दिला सल्ला?

नवं वर्ष नवं लोकेशन, तुझ्यात जीव रंगला आता दुसऱ्या वाड्यात; EXCLUSIVE VIDEO

First Published: Jan 10, 2020 09:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading