'बरं झालं बाप्पाचा विचार बदलला, नाही तर त्यानं आपलंच केलं असतं विसर्जन'

नुकत्याच झालेल्या आयफा 2019 च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सलमान खाननं मुंबईच्या पावसावर एक धम्माल जोक ऐकवला.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 04:28 PM IST

'बरं झालं बाप्पाचा विचार बदलला, नाही तर त्यानं आपलंच केलं असतं विसर्जन'

मुंबई, 06 सप्टेंबर : आपल्या देशाच्या काही भागात अद्याप पूस पडलेला नाही. तर मुंबई, कोल्हापूर सारख्या भागात पावसानं सर्वांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत एवढा मुसळधार पाऊस पडला की सर्वानाच 26 जुलैची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. त्यानंतर सोशल मीडियावरही मीम्सचा पाऊस पडला. मग अशात गप्प राहील तो सलमान कसला त्यानंही नुकत्याच झालेल्या आयफा 2019 च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुंबईच्या पावसावर एक धम्माल जोक ऐकवला.

आयफा अवॉर्ड 2019 ची प्रेस कॉन्फरन्स नुकतीच पार पडली यावेळी अभिनेत्री कतरिना कैफ आणि माधुरी दीक्षित यांनी सलमानसोबत या ठिकाणी हजेरी लावली होती. यावेळी सलमाननं हा जोक ऐकवून सर्वांना हसवण्याचं काम केलं. सलमान म्हणाला, यावर्षी गणपती विसर्जनाच्यावेळी असा पाऊस पडत होता की असं वाटलं यावेळी बाप्पाचं आमचं विसर्जन करणार आहेत. नेहमी आपण बाप्पाचं विर्सजन करतो. यावेळी बाप्पा म्हणाला आज मी तुमचं विसर्जन करणार. पण बरं झालं त्याचा विचार वेळीच बदलला.

TRP मीटर : 'मिसेस मुख्यमंत्री'ची लोकप्रियता कायम, 'ही' मालिका अजूनही नंबर 1

सलमान खान या पूर्ण इव्हेंटच्या वेळी मस्तीच्या मूडमध्ये दिसला. सलमाननं यावेळी फॉर्मल ब्लॅक शर्ट आणि ब्लू ट्राउझर घातली होती. मात्र त्याचं वागणं मात्र नेहमीप्रमाणंच कॅज्यूअल होतं. कतरिना कैफ बद्दल बोलायचं तर शॉर्ट डेनिम ड्रेसमध्ये दिसली. तर धकधक गर्ल माधुरी दीक्षित सुद्धा यावेळी ग्लॅमरस अंदाजात दिसली. दरवर्षी हा इव्हेंट देशाच्या बाहेर आयोजित केला जातो मात्र यंदा हा अवॉर्ड सोहळा भारतात आयोजित केला जाणार आहे.

‘सुहाना ड्रेस ठीक करो’, अंगप्रदर्शन न करण्याचा शाहरुखच्या लेकीला सल्ला

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायच तर तो सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोबतच अभिनेता महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सुद्धा सलमान सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. काही दिवासांपूर्वी या सिनेमातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सलमाननं सेटवर मोबाइल वापरण्यासाठी बंदी घातली.

Bigg Boss विनर शिवला वाढदिवसाच्या अगोदरच वीणानं दिलं ‘हे’ खास सरप्राइझ गिफ्ट

===================================================================

VIDEO: आरेतील वृक्षतोडीवर उर्मिला मातोंडकर यांचा कडाडून विरोध म्हणाल्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 04:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...