अनलॉक होताच सलमान-जॅकलीननं सर्वात आधी केलं हे काम, व्हायरल झाला VIDEO

अनलॉक होताच सलमान-जॅकलीननं सर्वात आधी केलं हे काम, व्हायरल झाला VIDEO

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खान त्याच्या कुटुंबातील सदस्यासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 जून : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलमान खान त्याच्या कुटुंबातील सदस्यासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर अडकला आहे. अर्थात इथे असतानाही तो वारंवार गरजूंना महाराष्ट्र सराकारला आणि मुंबई पोलिसांना वारंवार मदत करताना दिसत आहे आणि हे सर्व त्यानं लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून केलं आहे. पण जसं सर्व अनलॉक व्हायला सुरुवात झाली तसं सर्वात आधी सलमाननं त्याच्या आवडीचं एककाम केलं.ज्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहेत.

लॉकडाऊनचे काही नियम शिथील केल्यानंतर सलमाननं सर्वात आधी सायकलिंग केलं आहे. नवी मुंबईच्या मोकळ्या रस्त्यांवर सायकलिंग करतानाचे सलमानचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस सुद्धा दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सर्वात पुढे सलमान सायकल चालवताना दिसत आहे आणि त्याच्या मागे जॅकलिन आणि बाकी काही लोक सायकलिंग करताना दिसत आहेत. तर काही लोक सलमानला चियरअप करताना दिसत आहेत.

सलमान आणि जॅकलिन यांचं काही दिवसांपूर्वीच तेरे बिना हे अल्बम साँग रिलीज झालं होतं जे तुफान चाललं. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. या गाण्याची संपूर्ण शूटिंग सलमानच्या फार्म हाऊसवर करण्यात आलं आहे. या गाण्यात सलमान आणि जॅकलिनची केमिस्ट्री सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली होती. याशिवाय हे गाणं सुद्धा स्वतः सलमाननं गायलं आहे.

First published: June 3, 2020, 7:26 AM IST

ताज्या बातम्या