• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सलमान खान पुन्हा होणार अ‍ॅक्शन हिरो; साउथच्या या सुपरहिट चित्रपटाचा करतोय रिमेक

सलमान खान पुन्हा होणार अ‍ॅक्शन हिरो; साउथच्या या सुपरहिट चित्रपटाचा करतोय रिमेक

सलमान एका साउथ चित्रपटाच्या रिमेकच्या (South movie remake) तयारीत असल्याचही समजतं आहे.

 • Share this:
  मुंबई 10 जून : बॉलिवूडचा (Bollywood) मेगास्टार समजल्या जाणाऱ्या सलमान खानचे (Salman Khan) काही चित्रपट या वर्षी आणि पुढील वर्षासाठी सज्ज आहेत. याशिवाय आता सलमान एका साउथ चित्रपटाच्या रिमेकच्या  (South movie remake) तयारीत असल्याचही समजतं आहे. मागील महिन्यात सलमानचा ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe)  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. सलमान आता साउथच्या खिलाडी या चित्रपटाच्या रिमेकचा विचार करत आहे. एका वृत्तानुसार सलमानने साउथ स्टार रवी तेजाच्या या चित्रपटाचे राइट्स खरेदी देखील केले आहेत. या चित्रपटांचं दिग्दर्शन रोहीत वर्मा यांनी केलं आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. तर सलमानला हा टिझर फारच आवडला आहे. या टिझरच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांच्याही चांगल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळे सलमान देखील या चित्रपटाबाबत उत्सुक आहे. त्याने याबाबत निर्मात्यांशीही चर्चा केली असल्याचं समजतं आहे. पण त्यावर त्यांच नेमकं काय म्हणणं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  Video: उर्वशीची Strength पाहिलीत का? ट्रेनरचे इतके पंचेस घेतले; पाहून तुम्हीही व्हाल थक्क

  याशिवाय सलमान त्याच्या अन्य चित्रपटांतही व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’, ‘कभी ईद कभी दीवाली’, ‘टायगर 3’ आणि ‘किक 2’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच सलमानने त्याचं प्रंचड लोकप्रिय पात्र चुलबूल पांडेच्या अँनिमेटेड सीरिजची घोषणाही केली होती. यात चुलबूल पांडेच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी सांगितल्या जातात. 'दबंग: द अँनिमेटेड सीरीज' (Dabang) अस या सीरिजचं नाव आहे. शिवाय सलमान खान, शाहरुख खान (Shahrukh Khan) स्टारर 'पठान' (Pathan) मध्येही कॅमियो करताना दिसणार आहे. सलमानच्या धडाकेबाज एन्ट्रीची तयारी देखील झाल्याचं समजतं आहे.
  Published by:News Digital
  First published: