कतरिनाच्या ड्रेसवर सलमान नाराज

कतरिनाच्या ड्रेसवर सलमान नाराज

कतरिना केशरी रंगाचा एक बोल्ड मिनी ड्रेस घालून आली होती.या ड्रेसचा 'बोल्ड'पणा सल्लूमियाला काही रुचला नाही.

  • Share this:

03 जून : बॉलिवूडच्या चमचमत्या दुनियेतील लखलखत्या आयफा अॅवार्ड्सची सुरूवात धडाक्याने झाली.या अॅवार्डसच्या घोषणेसाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती.इथे सलमान खान हॉट अॅण्ड सेक्सी कतरिना कैफ आणि गोंडस आलिया भटसोबत आलेला.

कतरिना केशरी रंगाचा एक बोल्ड मिनी ड्रेस घालून आली होती.या ड्रेसचा 'बोल्ड'पणा सल्लूमियाला काही रुचला नाही.त्याने कतरिनाला तिचा ड्रेस नीट करायला सांगितलं.एवढंच नाही तर आलियालाही खाणाखुणांनी कतरिनाला 'ड्रेस नीट कर' असं सुचवायला सांगितलं. महत्त्वाची बाब म्हणजे कतरिनानेही खानसाहेबांच्या या हुकूमाची लगेच अंमलबजावणी केली.पूर्ण वेळ ती ड्रेसबाबत अनकम्फर्टेबल होती.

गोष्ट इथेच संपत नाही. आयफानंतर न्यूयाॅर्कमध्ये तू कुठे फिरायला जाशील असं आलियाला विचारल्यावर ती म्हणाली, 'जिथे सलमान आणि कतरिना मला नेतील.' तेव्हा आलियाला मधेच थांबवत सलमान गमतीत म्हणाला, 'कतरिना तिथे तिथे जाईल जिथे जिथे मी तिला नेईन. ' एवढंच नाही  तर सलमान कतरिनाच्या डान्सवर  खूप स्तुतिसुमनंही उधळत होता.

या साऱ्यात आलिया थोडी एकटीच पडली. तेव्हा आलिया आणि कतरिना बरोबरीच्या डान्सर आहेत असं सलमान म्हणाला.

First published: June 3, 2017, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading