दबंग सलमानसोबतच्या नात्याबाबत कतरिना म्हणाली,जेव्हा मी संकटात असते...

सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. तेवढं प्रेक्षक त्यांना ऑफस्क्रीन सुद्धा पसंत करतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 11:13 AM IST

दबंग सलमानसोबतच्या नात्याबाबत कतरिना म्हणाली,जेव्हा मी संकटात असते...

मुंबई, 07 सप्टेंबर : सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जेवढी प्रेक्षकांना आवडते. तेवढ प्रेक्षक त्यांना ऑफस्क्रीन सुद्धा पसंत करतात. सोशल मीडियावर तर त्यांच्या नात्याविषयी अनेकदा बोललं जातं. मात्र हे दोघंही या सर्व फक्त अफवा असल्याचं सांगतात. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिना सलमानसोबतच्या नात्याविषयी मोकळेपणानं बोलली. सलमान आणि तिच्यामध्ये नेमकं काय नातं आहे हेही तिनं स्पष्ट केलं.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कतरिना म्हणाली, सलमान आणि माझी ऑनस्क्रीन केमिस्ट्री जशी आहे तरी रिअल लाइफमध्ये अजिबात नाही. पण त्यानं मला प्रत्येकवेळी मदत केली आहे. एक मित्र म्हणून तो प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभा असतो. प्रत्येक यशानंतर माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

'बरं झालं बाप्पाचा विचार बदलला, नाही तर त्यानं आपलंच केलं असतं विसर्जन'

कतरिना पुढे म्हणाली, माझ्या जीवनात असाही काळ आला होता. जेव्हा मी आयुष्यातला सर्वात कठीण परिस्थितीतून जात होते. अशावेळी ना मी कोणाच्या संपर्कात होते आणि ना मला काही काही समजत होतं. आयुष्य फक्त चाललं होतं. अचानक सर्वकाही संपलं आणि मी त्यानंतर अशा ठिकणी येऊन पोहोचले ज्या ठिकाणी मी असायला हवं होतं आणि अशावेळी तो माझ्यासोबत होता.

भरलेला सिलेंडर घेऊन विद्युत जामवालनं केला खतरनाक स्टंट, पाहा VIDEO

कतरिना सांगते, मी आणि सलमान खूप चांगले मित्र आहोत. सलमान एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेऊ शकते आणि त्यामुळे मी आजही त्याच्यासोबत आहे. माझं त्याच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलवीरा यांच्याशीही खूप चांगलं नातं आहे. त्या दोघीही माझ्या तेवढ्याच जवळच्या आहेत. जेवढ्या त्या सलमानसाठी जवळच्या आहेत.

TRP मीटर : 'मिसेस मुख्यमंत्री'ची लोकप्रियता कायम, 'ही' मालिका अजूनही नंबर 1

सलमान आणि कतरिनानं आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे आणि विशेष म्हणजे, यातील बरेच सिनेमा हे सुपरहिट ठरले आहेत. अगदी अलिकडचा त्यांचा भारत सिनेमाही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.

=========================================================

भरलेलं सिलेंडर घेऊन विद्युतचं खतरनाक वर्कआऊट, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2019 11:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...