VIDEO दोन्ही हात नाहीत, तरी Indian Idon गाजवलं, आता सलमानबरोबर गायलं 'हे' गाणं

VIDEO दोन्ही हात नाहीत, तरी Indian Idon गाजवलं, आता सलमानबरोबर गायलं 'हे' गाणं

सलमानसोबतच्या व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

  • Share this:

मुंबई, 12 जुलै- सलमान खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. तो दरदिवशी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करतच असतो. नुकताच त्याने असा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला आयुष्य धैर्याने लढण्याचं प्रोत्साहन मिळेल. तुम्ही जर निराश असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. सलमानचा हा व्हिडिओ पाहून नेहमी प्रयत्न करत राहणं सोडता कामा नये अशीच शिकवण यातून मिळते.

सलमानने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सलमानसोबत जी व्यक्ती बसलेली दिसत आहे तो सोलो परफॉर्मर आणि इंडियन आयडॉल फेम थूपेन (Thupyen) आहे. सलमानने त्याची ओळख करून देताना म्हटलं की तो अरुणाचल प्रदेशचा आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला थूपेन आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे असा मेसेज देताना दिसतो. यानंतर तो सलमानसोबत फूलों के रंग से हे गाणंही गुणगुणतो.

 

View this post on Instagram

 

@thupten_the_solo_performer_889

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

थूपेनला दोन्ही हात नाहीत. (Differently Abled) पण तरीही तो फार आनंदी आहे आणि आपलं आयुष्य मनमुराद जगतो आहे. थूपेनने इंडियन आयडॉलच्या नवव्या सीझनमध्ये भाग घेतला होता. त्यावेळीही त्याने सर्वांना प्रोत्साहित केलं होतं.

 

View this post on Instagram

 

Dance class from the master himself . . Prabhu Deva @kichchasudeepa @wardakhannadiadwala

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान खानच्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा भारत सिनेमा प्रदर्शित झाला. सध्या तो दबंग 3 सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर तो संजय लीला भन्साळी यांच्या इन्शाअल्लाह सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत आलिया भट्ट असणार आहे.

Sacred Games Season 2 : शाळेत दोनदा नापास झालेला 'बंटी', एका रात्रीत असं बदललं नशीब

Bigg Boss Marathi 2 : त्या पांढऱ्या पँटवरून होणार का बिग फाईट?

आता अनुष्काच्या मागे लागले युझर, सुई धागाच्या जाळ्यात अडकला विराट कोहली

या 10 सेलिब्रिटींनी शेअर केले हॉट फोटो, एक तर बॉलिवूडची स्टार 

SPECIAL REPORT : धोनी भावूक झाला आणि चाहत्यांचा बांध फुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या