सलमान सुद्धा घेणार ‘नच बलिये 9’मध्ये भाग, कोण असेल त्याची जोडीदार

सलमान सुद्धा घेणार ‘नच बलिये 9’मध्ये भाग, कोण असेल त्याची जोडीदार

नच बलियेचा हा नववा सीझन यावेळी सलमान खान प्रोड्यूस करत आहे. त्यामुळे यावेळी शोची थीम पूर्णपणे वेगळी आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जुलै : सध्या टीव्हीवर अनेक रिअ‍ॅलिटी शो खूप चर्चेत आहेत. बिग बॉस 13 नंतर एक डान्स रिअ‍ॅलिटी शो मागच्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत आला आहे. हा शो म्हणजे ‘नच बलिये सीझन 9’. त्याच्या आगळ्या वेगळ्या थीममुळे हा शो यंदा खूप चर्चेत आहे. लवकरच हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोची ऑफिशियल लिस्ट समोर आहे. या शोच्या स्पर्धकांचे प्रोमो व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर आता या स्टार प्लसनं नवा प्रोमो व्हिडिओ रिलीज केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वजण गोंधळलेले आहेत.

स्टर प्लसच्या ऑफिशिअल इन्स्टाग्रामवर एका बाजूला शोचे स्पर्धक आणि इतर मालिकांमधील कलाकार दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सलमान खानची झलक दिसत आहे. यावरून या शोमध्ये सलमान सुद्धा त्याच्या बलिये सोबत या शोमध्ये सहभागी होणार असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे आता सलमानसोबत या शोमध्ये कोण सहभागी होणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

'या' दिवशी अनाजी पंतांना देणार हत्तीच्या पायाखाली, पाहा PHOTOS

नच बलियेचा हा नववा सीझन यावेळी सलमान खान प्रोड्यूस करत आहे. त्यामुळे यावेळी शोची थीम पूर्णपणे वेगळी आहे. यावेळी नच बलियेच्या डान्स फ्लोअरवर कपल्स सोबत एक्स कपल्स सुद्धा दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी याच्या पहिल्या एपिसोडच्या शूटिंग दरम्यान एका एक्स कपलमध्ये जोरदार भांडण झाल्याचं समजलं होतं. मात्र नंतर या कपलनं हे वृत्त फेटाळून लावलं होतं.

...म्हणून प्रेक्षकांची लाडकी सूनबाई पुन्हा येतेय छोट्या पडद्यावर

हा शो मनिष पॉल होस्ट करणार आहे. तर परिक्षक म्हणून रविना टंडन, अली अब्बास जफर आणि आणखी एक प्रसिद्ध कोरिओग्राफर काम पाहणार आहेत. मात्र या कोरिओग्राफरचं नाव अद्याप समजलेलं नाही. याशिवाय आणखी एक अभिनेता असेल जो या शोला जज करणार आहे.

माझ्या नवऱ्याची बायको! बिपाशानं सुचवला पती करणच्या पत्नीचा ब्रायडल लुक

============================================================

VIDEO: मलायका अरोराच्या फिटनेसचं रहस्य काय?

First published: July 14, 2019, 9:50 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading