'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, 'टायगर'ची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी

'दबंग 3'च्या शूटिंगसाठी सलमान खान बारामतीत, 'टायगर'ची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची तोबा गर्दी

सिनेमाची शूटिंग पाहण्यासाठी सलमानचे चाहते मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत.

  • Share this:

जितेंद्र जाधव, बारामती, 17 जुलै : अभिनेता सलमान खान याच्या 'दबंग 3' या चित्रपटाचे शूटिंग सध्या बारामती परिसरात सुरू आहे. यावेळी सलमान खानला पाहण्यासाठी तरुण वर्ग आणि त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

बॉलिवूडचा दबंग खान आपल्या गावात आल्याची बातमी पसरल्यानंतर आवडत्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी तरुण अक्षरश: घरांच्या छतावर, इमारतींवर चढत आहेत. तसंच टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जोरात आवाज देताना दिसत आहेत.

सिनेमाची शूटिंग पाहण्यासाठी आलेल्या सलमानच्या चाहत्यांमुळे सुरक्षारक्षक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथं तैनात करण्यात आला आहे. असं असलं तरीही चाहत्यांचा उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही.

कधी रिलीज होणार 'दबंग 3'?

बारामती आणि फलटण या परिसरात 22 जुलैपर्यंत या चित्रपटाचे शूटिंग होणार असून हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता सलमान खानसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, महेश मांजरेकर यांची कन्यादेखील झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केलं आहे.

दरम्यान, शूटिंग सुरू असताना सलमान खानचा ओपन जीप मधला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. ही ओपन जीप राहुल जगताप यांची असून या ओपन जीपचा 25 हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात वापर केला गेला आहे. आता दबंग 3 या चित्रपटातही ही ओपन जीप दिसणार आहे.

कंबरे एवढ्या पाण्यातून जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रशासनाचा मात्र कानाडोळा

First published: July 17, 2019, 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading