saजोधपूर, 01 नोव्हेंबर: सलमान खान (Salman Khan) सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या प्रचंड व्यस्त आहे. पण त्याच्यावर एकेकाळी झालेल्या आरोपांमधून अजूनही त्याची सुटका झालेली नाही. काळवीट शिकारप्रकरणी आज (1 डिसेंबर) सलमानची राजस्थामधील कोर्टात सुनावणी होती. पण तो कोर्टात हजर राहू शकणार नाही अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली. न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.
काळवीट शिकारप्रकरणी राजस्थानच्या सेशन कोर्टामध्ये सलमानची सुनावणी होती. सलमानने स्वत: तिथे उपस्थित राहणं आवश्यक होतं. पण मुंबई आणि राजस्थानमध्ये कोरोना भरपूर वाढला आहे. त्यामुळे हा धोका मी पत्करु शकत नाही. असं कारण देत सलमानने तिथे जाण्याचं टाळलं. विशेष म्हणजे, सलमान खानला 5 एप्रिल 2018 रोजी या प्रकरणात दुय्यम कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर सलमानने शिक्षेविरोधात जिल्हा आणि सत्र जिल्हा न्यायालयात अपील केले आहे. त्याचबरोबर आर्म्स अॅक्ट प्रकरणात सलमानला निर्दोष सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने एक आव्हान दिले आहे. आज या दोन्ही खटल्यांची सुनावणी होणार होती. आता ही सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.
काय होता आरोप?
'हम साथ साथ हैं' सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी सलमान खान आणि इतर कलाकार एका रात्री फिरायला बाहेर पडले होते. एका जिप्सी कारमध्ये सगळे होते आणि सलमान ती कार चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असा आरोप सलमान खानवर होता.