16 सप्टेंबर : सलमान खानचा ब्रिटिश संसदेकडून गौरव करण्यात आलाय. त्याला ग्लोबल डायव्हर्सिटी अॅवाॅर्ड देऊन त्याचा गौरव करण्यात आलाय.
ब्रिटिश संसदेचे सदस्य किथ वाज यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला. यावेळी किथ वाज म्हणाले, ' हा पुरस्कार जगात काही वैविध्यपूर्ण गोष्टी करणाऱ्याला देतात. सलमान खाननं फक्त सिनेमांमध्ये महान कार्य केलं नाहीय, तर मानवतावादी कामंही केली आहेत. '
सलमान म्हणाला, 'तुम्ही जो माझा गौरव केलाय त्याबद्दल धन्यवाद. असा सन्मान मला मिळेल असा विचार माझ्या वडिलांनीही कधी केला नसेल.'
सलमान सध्या दबंग टुरसाठी लंडनमध्ये आहे. त्या कार्यक्रमात सोनाक्षी सिन्हा, जॅकलीन फर्नांडिस, प्रभुदेवा, बादशहा, सूरज पांचोलीही आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा