मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Daagdi Chaawl 2 : सलमान खानने दिल्या 'दगडी चाळ 2' चित्रपटाला शुभेच्छा; शेअर केला स्पेशल व्हिडीओ

Daagdi Chaawl 2 : सलमान खानने दिल्या 'दगडी चाळ 2' चित्रपटाला शुभेच्छा; शेअर केला स्पेशल व्हिडीओ

 DaagdiChaawl 2

DaagdiChaawl 2

दगडी चाळ २' हा चित्रपट येणार असल्याचे समजल्यापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटातील पहिले आणि गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. या गाण्यातुन बॅालिवूडमधील नायिका डेझी शाहने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 9 ऑगस्ट : सत्य घटनेवर आधारित असलेला  'दगडी चाळ ' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात अंकुश चौधरी, मकरंद देशपांडे आणि पूजा सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता  'दगडी चाळ २' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता येत्या 18 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. आता या चित्रपटातील पहिले आणि जबरदस्त गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.या गाण्यांमधून सलमान खानची नायिका मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ' राघू पिंजऱ्यात आला ' असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या टीझरलाच प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या गाण्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री डेझी शाह या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटाद्वारे  डेझी शाहने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. आता डेझी शाहने या बॅालिवूडमधील नामांकित चेहऱ्याने या गाण्याच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. . मुग्धा कर्‍हाडे यांनी गायलेल्या आणि अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘राघू पिंजऱ्यात आला’ या आयटम नंबरमधील तिच्या किलर परफॉर्मन्सने ही नायिका इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
  आता बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या सोशल मीडियावर या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटातील 'राघू पिंजऱ्यात आला' हे गाणे शेअर करत  “शुभेच्छा #DaagdiChaawl2'' असा कॅप्शन लिहिला आहे. हेही वाचा - Devmanus 2: डिंपलला मिळणार अजितकुमार विरुद्ध पुरावा; आता डॉक्टरचा खेळ संपणार? त्याच्या या पोस्टवर डेझी शाहने कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत. सलमान खानने मराठी चित्रपटाला शुभेच्छा देण्याची हि काही पहिलीच वेळ नाही. याआधी धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च साठी आला होता. सध्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला अंकुश चौधरी देखील विविध ठिकाणी प्रमोशन करत आहे. चित्रपटाची कथा मच्छिंद्र बुगडे यांनी लिहिली असून संवाद संजय जमखंडी यांचे आहेत. आता दगडी चाळ  २ ची कथा नेमकी काय  असेल याचं  गूढ येत्या १८ ऑगस्टला समजेल.
  Published by:Nishigandha Kshirsagar
  First published:

  Tags: Marathi cinema, Salman khan

  पुढील बातम्या