दबंग 3च्या विलनवर सलमान खान फुल्ल टू इंप्रेस, डायरेक्ट गिफ्ट केली 2 कोटी कार

दबंग 3च्या विलनवर सलमान खान फुल्ल टू इंप्रेस, डायरेक्ट गिफ्ट केली 2 कोटी कार

या भेटवस्तूमुळे किच्चा खूपच खूश झाला होता. यावेळी सलमान आणि कारसोबतचे अनेक फोटो त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : सलमान खानचे इंडस्ट्रीमध्ये त्याच्या मित्रांसोबत खास प्रेमाचे संबंध आहेत हे सगळ्यांनीच पाहिलं आहे. सलमान सहसा आपल्या सह-कलाकार आणि मित्रांना भेटवस्तूही देत असतो. परंतु दबंग 3 मधील खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता किच्चा  सुदीप या बाबतीत खूपच लकी ठरला आहे. कारण, सलमानने त्याला एकाच वेळी दोन खास आणि मौल्यवान भेटवस्तू दिल्या आहेत. नुकताच सलमान खान साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीपच्या घरी गेला होता. यावेळी सलमानने त्याला नवीन बीएमडब्ल्यू एम 5 कार गिफ्ट केली होती.

या भेटवस्तूमुळे किच्चा खूपच खूश झाला होता. यावेळी सलमान आणि कारसोबतचे अनेक फोटो त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'जेव्हा आपण चांगलं करतो तेव्हा नेहमीच चांगलं होतं. सलमान खान सरांनी पुन्हा एकदा माझ्य़ावर विश्वास टाकला आहे आणि मला हे विशेष गिफ्ट दिलं आहे. तुम्ही माझ्यावर आणि माझ्या कुटूंबियांबद्दल दाखवलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. तुमच्याबरोबर काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि आपण माझ्या घरी आलात याचा मला आनंद झाला.'

 

View this post on Instagram

 

Good always happens when u do good. @beingsalmankhan sir made me believe this line further when this surprise landed at home along with him. BMW M5.... .. a sweetest gesture. Thank u for the luv u have showered on me n my family sir. It was an honour to have worked with u n to have had u vist us.

A post shared by kicchasudeep (@kichchasudeepa) on

यापूर्वी सलमानने सुदीपला एक खास जॅकेट गिफ्ट केलं होतं. या जॅकेटच्या मागील बाजूस सलमानच्या आवडत्या कुत्र्याचं चित्र आहे. किच्चाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून त्यात तो हे जॅकेट घालून दिसत आहे आणि सलमान या जॅकेटवर छापलेल्या कुत्र्याला किस करताना दिसला होता. हे फोटो चाहत्यांमध्ये जोरदार व्हायरल झाले होते.

इतर बातम्या - दीपिकाही पोहोचली JNUमध्ये, कन्हैया कुमारबरोबर विद्यार्थ्यांची घेतली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2020 08:30 AM IST

ताज्या बातम्या