सलमान खाननं खरंच रानू मंडल यांना दिलं 55 लाखांचं घर? वाचा काय आहे सत्य

सलमान खाननं खरंच रानू मंडल यांना दिलं 55 लाखांचं घर? वाचा काय आहे सत्य

अभिनेता सलमान खाननं रानूला महागडं घर भेट म्हणून दिल्याचं बोललं जात होतं.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : सध्या सोशल मीडिया स्टार बनलेल्या रानू मंडल यांची रेल्वेस्टेशन वरील गायक ते बॉलिवूड प्लेबॅक सिंगर हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. आज रानू मंडल यांना ओळखत नाही असं क्वचितच कोणी भेटेल. जिथे पाहावं तिथे आज रानू यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या आवाजाची जादूच अशी आहे की, प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया सुद्धा स्वतःला थांबवू शकला नाही आणि त्यानं रानू यांना त्याच्या सिनेमातील गाण्यासाठी ऑफर देऊ केली. आता तर तिनं एक नाही तर दोन गाणी हिमेश रेशमियासाठी गायली आहेत. या दरम्यान अभिनेता सलमान खाननं रानूला महागडं घर भेट म्हणून दिल्याचं बोललं जात होतं.

सलमान खान रानूच्या गाण्यानं एवढा इम्प्रेस झाला की त्यानं त्याला जवळपास 55 लाखांचं घर मुंबईमध्ये देऊ केल्याचं बोललं जात होतं मात्र या चर्चा आता फक्त अफवा असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान रानूचं गाणं ऐकत असल्याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर सलमाननं रानूला भेट म्हणून मुंबईमध्ये घर दिल्याचं म्हटलं जात होतं. मात्र ही सर्व वृत्त खोटी असल्याचं रानू यांच्या जवळच्या सुत्रानी सांगितलं.

याशिवाय रानू यांनी 15 लाखांची कार खरेदी केली असल्याचंही बोललं जात होतं. तसेच सलमान खाननं तिला बिग बॉसमध्येही ऑफर दिल्याचं बोललं जात होतं. मात्र रानू यांच्या जवळच्या सुत्रांनी या सर्व गोष्टी खोट्या असल्याचं सांगितलं आहे. एवढंच नाही तर हिमेश रेशमियानं तिला दिलेल्या फि बाबतच्या चर्चा अफवा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हिमेशनं रानू यांना खूप मदत केल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे.

रानू काही दिवसांपूर्वी एका रेल्वे स्टेशनजवळ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचं गाणं ‘एक प्यार का नगमा हैं’ गाताना दिसल्या होत्या. एका व्यक्तीनं त्यांचा गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि रानू रातोरात स्टार झाल्या. या एका व्हिडीओनं त्यांचं अवघं आयुष्यच बदलून टाकलं. याबाबत बोलताना रानू सांगतात, 'हा माझा दुसरा जन्म आहे आणि मी त्याला अधिकाधिक चांगला बनवण्याचा प्रयत्न करेन.' रानू यांना आतापर्यंत अनेक ऑफर्स मिळाल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी त्यांच्या मुलीशी झालेली भेट हे सर्वात मोठं गिफ्ट होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 10 वर्षांपासून आपल्या मुलीपासून दूर गेलेल्या रानू यांना त्यांची मुलगी परत मिळाली.

================================================================

VIDEO: गणेशोत्सवाच्या 'या' दिवसांत रात्री 12 पर्यंत स्पीकर्सना परवानगी इतर टॉप 18 बातम्या

First published: August 31, 2019, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading