VIDEO: तरुणीने गर्दीत खेचला सलमानचा हात, चाहते म्हणाले थोबाडीत मार!

VIDEO: तरुणीने गर्दीत खेचला सलमानचा हात, चाहते म्हणाले थोबाडीत मार!

सलमानच्या एका चाहतीचं हे बेशिस्त वर्तन पाहून अनेकांना सलमानचा राग स्वाभाविक वाटत आहेत.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’च्या शूटिंगनमध्ये बीझी आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या सेटवरील त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर आता सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सलमानच्या सिनेमाचा नाही तर त्याच्या एका अतरंगी चाहतीचा आहे. ही चाहती सलमानसोबत खूपच बशिस्तपणे वागताना दिसली. ज्यामुळे सलमानली तिचा राग आला. हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम खूप व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सलमान खान मीडिया आणि चाहत्यांच्यामधून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ कोणत्यातरी इव्हेंट किंवा एअरपोर्टवरील असल्याचं समजतं. सलमान शांतपणे तिथून जात असताना, त्या गर्दीतून एक चाहती बाहेर येते आणि सलमानचा हात पकडून त्याला काहीतरी बोलताना दिसते. यावर सलमान तिचं बोलणं ऐकून हसतो आणि पुढे जातो. मात्र त्यानंतर ती मुलगी त्याच्या हाताला पकडून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करते.

...तर माझंही 'तिहेरी तलाक'ला समर्थन असतं, विद्या बालनची प्रतिक्रिया

 

View this post on Instagram

 

#SalmanKhan does not appreciate a fan pulling him like this

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सलमान खान या झटक्यामुळे काहीसा आश्चर्यचकीत होतो. पण नंतर तिच्याकडे रागानं पाहून निघून जातो. सलमानचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर त्या चाहतीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी सलमाननं त्या चाहतीच्या खरंच कानाखाली मारायला हवी होती असं म्हटलं आहे. या चाहतीला सर्वांनीच बेशिस्त म्हटलं आहे. सोशल मीडियावर सर्वजण सलमानचं समर्थन करत असून सलमान खानचं अशाप्रकारे रागावणं स्वभाविक असलेल्याचं म्हटलं आहे.

पावसात फिरायला निघाली शिल्पा शेट्टी, पण ड्रेसनं 'असा' दिला दगा

सलमानच्या सिनेमांबद्दल बोलायचं तर तो सध्या ‘दबंग 3’ शूट करत आहे. यानंतर तो आलिया भटसोबत 'इंशाह अल्लाह’चं शूटिंग सुरू करणार आहे. सलमान आणि आलिया या सिनमाच्या निमित्तानं पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार असून यासाठी हे दोघंही खूप उत्सुक आहेत. याशिवाय जूनमध्ये रिलीज झालेल्या सलमानच्या भारत या सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला होता.

VIDEO : संगतीचा परिणाम! अतरंगी ड्रेसमुळे दीपिका पदुकोण झाली ट्रोल

====================================================================

पुरातून वाचवताना निसटला आणि झाडाला अडकला, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 12:36 PM IST

ताज्या बातम्या