Dabangg अभिनेता सलमान खानला अ‍ॅक्शन सीन शूट करताना वाटते 'या' गोष्टीची भीती

Dabangg अभिनेता सलमान खानला अ‍ॅक्शन सीन शूट करताना वाटते 'या' गोष्टीची भीती

अ‍ॅक्शन सीन करणं कठीण जात असल्याचं सलमाननं नुकतंच एका मुलाखाती दरम्यान सांगितलं.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै : अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी सिनेमा दबंग 3 च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमासाठी सलमान जोरदार तयारी करत आहे. मागच्या काही दिवसांपासून सलमान त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत त्याचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत आहे. दबंग सीरिज मधील हा 3 रा सिनेमा असून सलमान या सिनेमातही मागच्या दोन्ही सिनेमांप्रमाणंच स्टंट करताना दिसणार आहे. मात्र आता वाढत्या वयात अ‍ॅक्शन सीन करणं कठीण जात असल्याचं सलमाननं नुकतंच एका मुलाखाती दरम्यान सांगितलं.

प्रेक्षक म्हणताहेत राणादा 'तुझ्यात जीव रंगला', 'या' मालिकेनं गमावलं आपलं स्थान

 

View this post on Instagram

 

Being strong equipment displayed in delhi at the pragati maidan agar aas pass ho aur time ho toh go check it out n feed back de Dena #beingstrong @realstrong.in @aaba81 @beingstrongindia

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान म्हणाला, या वयात सिनेमांमध्ये अ‍ॅक्शन सीन देणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. अनेकदा माझं वाढतं वय मला त्रास देतं. तसं पाहिलं तर मी पहिल्यापासून अ‍ॅक्शन सिनेमे केलेले असल्यानं माझ्या बॉडीला त्याची सवय झाली आहे मात्र काही ठराविक काळानंतर याचा त्रस होतोच. मला प्रत्येक सीन शूट करण्याआधी त्याची 5-6 वेळा रिहर्सल करावी लागते. त्याच अनेका पडतो-आपटतो. प्रत्येक सीन करण्यासाठी एवढी एनर्जी लागते की, तो सीन करता करता मी थकून जातो. पण जोपर्यंत आम्ही जखमी होत नाही तो पर्यंत आम्ही ते करत राहतो.

संजू सिनेमातल्या '300 मुलींसोबत सेक्स'चा डायलॉग तुम्हाला चालतो, शाहिदची सटकली

सलमान पुढे म्हणाला, ‘अनेकदा मला माझ्या वाढत्या वयाचीही भीती वाटते. कारण, आम्हाला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं आणि चांगलं द्यायचं असतं. त्यामुळे तुम्हाला खूप हार्डवर्क करावं लागतं. तुम्ही याठिकणी बेशिस्तपणे वागू शकत नाही.’ याशिवाय कामाचं शेड्युल बीझी असल्यानं सलमान रोज फक्त 2-3 तास झोप घेतो. पण ज्यावेळी त्याला वेळ मिळतो त्यावेळी तो पेटिंग करतो. किंवा मग टीव्ही पाहतो.

‘सेक्स’वर बोलणार सोनाक्षी सिन्हा, ट्विटरवर शेअर केला नंबर

 

View this post on Instagram

 

Mom is saying band karo yeh naach ganna..

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमान सांगतो, मी जास्त वेळ झोपू शकत नाही. जास्तीत जास्त मी 2-3 तास झोपतो. त्यानंतर मी लिहितो, पेंटिंग करतो, किंवा मग मी टीव्ही पाहतो. अनेकदा मी टीव्ही पाहतो त्यावेळी त्यावर फक्त जाहिराती सुरु असतात.

=========================================================================

ऑन ड्युटी टिक टॉक VIDEO करणं महिला पोलिसांच्या अंगलट, निष्काळजीपणा भोवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 04:57 PM IST

ताज्या बातम्या