Home /News /entertainment /

सलमान खानने बाप्पाला दिला निरोप; भाचा अहिलसह शेवटची आरती करताना VIDEO VIRAL

सलमान खानने बाप्पाला दिला निरोप; भाचा अहिलसह शेवटची आरती करताना VIDEO VIRAL

दरवर्षीप्रमाणे यंदाही सलमान खानने उत्साहात आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आणि आता आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे.

    मुंबई, 23 ऑगस्ट : अभिनेता सलमान खान (salman khan) दरवर्षी मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा करतो. यंदाही त्याच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं. उत्साहात त्याने आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आणि आता त्याने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोपही दिला आहे. त्याने बाप्पाची आरतीही केली आहे. सलमानने दीड दिवसांनी आपल्या घरच्या बाप्पाचं विसर्जन केलं आहे. घराच्या आवारात बनवलेल्या कृत्रिम तलावाता बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. खान कुटुंबाच्या बाप्पाच्या शेवटच्या आरतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाप्पाची आरती करताना सलमानने भाचा अहिलला आपल्या हातात घेतलं आणि अहिलसह त्याने आरती केली. सलमानने फक्त बाप्पाची आरतीच केली नाही तर बाप्पाला निरोप देण्यापूर्वी त्याच्या कानात त्याला काहीतरी सांगितलं आहे. बाप्पाकडून त्याने आशीर्वाद मागितले आहेत. बाप्पाला विसर्जन करताना सलमानसह, हेलेन, अरबाज खान आणि सोहेल खान, अलविरा खान अग्निहोत्री, अर्पिता खान शर्मा, आयुष शर्मा आणि अर्पिता-आयुषची मुलंं अहिल शर्मा आणि आयत शर्मादेखील दिसले. सलमानच्या कुटुंबास त्याचा मित्रपरिवारही गणेश विसर्जनाला उपस्थित होता. हे वाचा - सोनू सूदने केली मदत, आता पुण्याची वॉरिअर आजी देतेय स्वसंरक्षणाचे धडे; पाहा VIDEO सलमान लवकरच बिग बॉस 14 चं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला. हा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Salman khan

    पुढील बातम्या