Home /News /entertainment /

सलमाननं 'या' व्यक्तीचा सव्वा रुपया ठेवला उधार, आठवण केल्यानंतर आली अशी वेळ

सलमाननं 'या' व्यक्तीचा सव्वा रुपया ठेवला उधार, आठवण केल्यानंतर आली अशी वेळ

सलमान खाननं नुकत्याच एका फंक्शनमध्ये एका व्यक्तीचा सव्वा रुपया उधार ठेवल्याचा किस्सा शेअर केला.

  मुंबई, 26 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता सलमान खान नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. मागच्या वर्षी रिलीज झालेला त्याचा ‘दबंग’ सिनेमा बॉक्स तुफान चालला. त्यानंतर यंदा ईदच्या मुहूर्तावर त्याचा ‘राधे’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण सध्या सलमान त्यानंच केलेल्या एका अनोख्या कबुलीमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच एका फंक्शनमध्ये एका व्यक्तीचा सव्वा रुपया उधार ठेवल्याचा मजेदार किस्सा शेअर केला. यासोबत त्या व्यक्तीनं जेव्हा त्याची आठवण करुन दिली तेव्हा काय हालत झाली हे सुद्धा सलमाननं यावेळी सांगितलं. मुंबईमध्ये पार पडलेल्या मुंबई पुलिस वेल्फेयर फंड इनिशिएटिव इवेंट 'उमंग 2020’ मध्ये सलमाननं हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्माशी बोलताना सलमाननं या गोष्टीचा खुलासा केला. सलमान म्हणाला मी एका मॅकेनिकचे सव्वा रुपया उधार ठेवला होता आणि ही गोष्ट मला तेव्हा समजली जेव्हा मी काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे पुन्हा माझी सायकल ठिक करायला गेलो. त्यावेळी मी शॉर्ट्स घातल्यानं माझ्याकडे पैसे नव्हते मी त्यांना म्हणालो मी नंतर देतो पैसे. कंगना रणौत ते अदनान सामीसह 'या' बॉलिवूड कलाकारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
  सलमान पुढे सांगतो, माझं बोलणं ऐकून ते काका म्हणाले, ‘तू लहान होतास तेव्हाही असंच करायचास. त्यावेळी तू एकदा माझ्याकडून सायकल ठिक करुन घेतली होतीस आणि आजपर्यंत त्याचे पैसे दिलेले नाहीत. आजही तुझा सव्वा रुपया उधार आहे.’ त्या काकांचं बोलणं ऐकल्यावर मला खूपच लाज वाटली. पण मी जेव्हा त्यांना त्यांचे पैसे परत करायला गेलो तेव्हा मात्र त्यांनी ते घेण्यास नकार दिला. सेजल शर्मा आत्महत्या प्रकरण: संशयाची सुई बॉयफ्रेंडवर, कुटुंबीयांची चौकशीची मागणी याशिवाय सोनी टीव्हीनं नुकत्याच त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सलमान खान डान्स केल्यानंतर कपिल शर्माच्या प्रश्नांची उत्तरं देताना दिसत आहे. यावेळी कपिल शर्मा विचारतो. जेव्हा सोशल मीडियावर तुझ्या फिमेल फॅन तुला मसेज करतात मग कधी असं झालं आहे का की एखादी मुलगी तुला खूपच सुंदर दिसली तर तू तिचा फोटो झूम करुन कधी पाहतोस का? यावर सलमान म्हणाला मी बाकी कोणाचे नाही मात्र कतरिनाचा प्रत्येक फोटो झूम करून पाहतो. बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचं 'इंडियन आर्मी कनेक्शन' तुम्हाला माहित आहे का?
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Salman khan

  पुढील बातम्या