मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Salman Khan या 7 अभिनेत्रींनाच करतो follow; पाहा या आहेत तरी कोण?

Salman Khan या 7 अभिनेत्रींनाच करतो follow; पाहा या आहेत तरी कोण?

बॉलिवूडचा भाईजान केवळ सातच अभिनेत्रींना फॉलो करतो. (Salman Khan Instagram) पाहूया त्या अभिनेत्री आहेत तरी कोण?

बॉलिवूडचा भाईजान केवळ सातच अभिनेत्रींना फॉलो करतो. (Salman Khan Instagram) पाहूया त्या अभिनेत्री आहेत तरी कोण?

बॉलिवूडचा भाईजान केवळ सातच अभिनेत्रींना फॉलो करतो. (Salman Khan Instagram) पाहूया त्या अभिनेत्री आहेत तरी कोण?

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 25 जुलै: सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. अन् सलमान देखील सोशल मीडियाद्वारे विविध फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. (Salman Khan social media post) त्यामुळे जगभरातील कोट्यवधी नेटकरी त्याला फॉलो करतात. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल कोट्यवधी लोक ज्याला फॉलो करतात तो बॉलिवूडचा भाईजान केवळ सातच अभिनेत्रींना फॉलो करतो. (Salman Khan Instagram) पाहूया त्या अभिनेत्री आहेत तरी कोण?

बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भीषण कार अपघात; घटनेत मैत्रीणीचा जागीच मृत्यू

सलमान खानला इन्स्टाग्रामवर जवळपास 4 कोटी 20 लाख लोक फॉलो करतात. त्यामुळे तो देखील आपल्या खासगी आयुष्यातील विविध घटना सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत शेअर करतो. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्यांना व्यायाम करण्यासाठी प्रवृत्त करतो. शिवाय गरजवंतांना मदत देखील करतो. सलमान इन्स्टाग्रामवर केवळ 27 लोकांनाच फॉलो करतो. यामध्ये कतरिना कैफ, इसाबेल कैफ, संगीता बिजलानी, डेजी शाह, जैकलीन फर्नांडिस, यूलिया वंतूर (Iulia Vantur) आणि वालूश्चा डिसूजा या सात अभिनेत्री आहेत.

प्रशांत दामले का नाकारतात चित्रपटांच्या ऑफर? 20 वर्ष करतायेत रंगभूमीवर काम

यापूर्वी सलमान एका आर्थिक फसवणूकीच्या आरोपामुळे चर्चेत होता. सलमान (Salman Khan) आणि त्याची बहिण अलवीरा खान (Alvira Khan) यांच्या विरोधात चंदिगढमधील एका व्यवसायिकानं आर्थिक फसवणूकीची तक्रार केली होती. (financial fraud case) दरम्यान या तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत चंदिगढ पोलिसांनी सलमानसह त्यांच्या बिंग ह्युमन (Being Human) कंपनीतील अधिकाऱ्यांना समन्स बजावलं होतं. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Salman khan