S M L

...आणि म्हणून सलमान त्याचे सिनेमे ईदलाच प्रदर्शित करतो !

सलमान लग्न कधी करणार या प्रश्नासारखा अजून एक प्रश्न सलमानच्या चाहत्यांच्या मनात असतो तो म्हणजे सलमान त्याचे सिनेमे ईदलाच का रिलीज करतो, आणि आम्ही तुम्हाला हेच राज सांगणार आहोत.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 12, 2018 12:02 PM IST

...आणि म्हणून सलमान त्याचे सिनेमे ईदलाच प्रदर्शित करतो !

मुंबई, 12 जून : आपल्या सगळ्यांचा लाडका सल्लू मिया नेहमीच त्याचा सिनेमा ईदच्या सणाला प्रदर्शित करतो. प्रत्येक वर्षाच्या ईदला सलमानचा एक नवा सिनेमा त्याच्या चाहत्यांसाठी मेजवाणी घेऊन येत असतो.

पण सलमान लग्न कधी करणार या प्रश्नासारखा अजून एक प्रश्न सलमानच्या चाहत्यांच्या मनात असतो तो म्हणजे सलमान त्याचे सिनेमे ईदलाच का रिलीज करतो, आणि आम्ही तुम्हाला हेच राज सांगणार आहोत.

दच्या सणाला सिनेमे रिलीज करण्याची पद्धत 2009 पासून सुरू झाली. तेव्हापासून सलमान प्रत्येक वर्षी ईदला सिनेमा रिलीज करून बॉक्स ऑफिसला 'ईदी' देत असतो.

2009 या वर्षी त्याने 'वाँटेड' हा सिनेमा ईदला प्रदर्शीत केला, आणि तेव्हापासून ईद आणि सलमानचा सिनेमा हे गणित पक्कं झालं आहे. 'वाँटेड' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 130 कोटीची कमाई केली होती.

2009 आधी सलमानचे सिनेमे वारंवार फ्लॉप होत होते, पण ईदच्या सणामुळे सलमानचे सिनेमे पुन्हा एकदा गाजू लागले.

Loading...
Loading...

2010मध्ये सलमानच्या 'दबंग' सिनेमाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. या सिनेमाने 144 कोटींची कमाई केली. तेव्हापासून ईद भाईजानच्याच नावे झाली असं म्हणायला हरकत नाही.

2011मध्ये 'बॉडिगार्ड' सिनेमा ईदला प्रदर्शीत झाला आणि त्याने 149 कोटींची कमाई केली. त्यानंतर आलेल्या 'एक था टायगर' सिनेमाने तर त्याला बॉलिवूडचा वाघच झाला.

या अशा जबरदस्त कमाईमुळे निर्माते आणि दिग्दर्शकांनाही खात्री झाली की ईद हा सण सलमानसाठी लकी आहे. त्यामुळे 2014चा 'किक' सिनेमाही ईदला प्रदर्शित करण्यात आला आणि या सिनेमानेही 200 कोटींची कमाई केली.

2015मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बजरंगी भाईजान' सिनेमाने 330 कोटींची कमाई केली.

त्यानंतर 2016मध्ये 'सुलतान' सिनेमाने 300 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर एका नविन क्लबची सुरूवात केली.

लमानची ईद मॅजिक मात्र 'ट्युबलाईट' सनेमात ओसरल्याची दिसून आली. या सिनेमाने 120 कोटींची कमाई केली खरी पण प्रेक्षकांनी सिनेमावर जोरदार टीका केली होती.

यावर्षीच्या ईदला सलमानचा 'रेस-3' सिनेमा प्रदर्शीत होणार आहे. आता या सिनेमात सलमानची ईद मॅजिक किती काम करते ते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 12:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close