Home /News /entertainment /

सलमानच्या चाहत्यांना बसणार shock; ‘राधे’ चित्रपटाबाबत वाईट बातमी आली समोर

सलमानच्या चाहत्यांना बसणार shock; ‘राधे’ चित्रपटाबाबत वाईट बातमी आली समोर

सलमानच्या चाहत्यांसाठी या चित्रपटाबाबत एक दुखद बातमी आहे. ही बातमी वाचून भाईजानचे चाहते निराश होण्याची शक्यता आहे. (Radhe : Your Most Wanted Bhai)

    मुंबई 26 मार्च: बॉलिवूडचा (Bollywood) भाईजान सलमान खान (Salman Khan) राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) या चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. कोरोनामुळं लांबणीवर गेलेला हा चित्रपट येत्या 13 मे रोजी ईदच्या मुहूर्तावर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु सलमानच्या चाहत्यांसाठी या चित्रपटाबाबत एक दुखद बातमी आहे. ही बातमी वाचून भाईजानचे चाहते निराश होण्याची शक्यता आहे. बातमी अशी आहे की या चित्रपटाचा टीजर (Teaser) आता चाहत्यांshocking newsना पाहायला मिळणार नाही. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी टीजर प्रदर्शित करण्याची योजना आखली होती; पण अचानक हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता थेट या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. टीजर रद्द करण्याच्या निर्णयामागचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेलं नाही. निर्मात्यांनीही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अवश्य पाहा - मुलांची जबाबदारी झटकणं अभिनेत्रीला पडलं महागात; मनोरंजनसृष्टीतून झाली हकालपट्टी दबंगभाई सलमान खानचा प्रदीर्घ कालावधीनंतर येणारा हा चित्रपट असल्यानं याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये दिशा पटानी,रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सलमान खान फिल्म्स (Salman Khan Films) आणि झी स्टुडीओ (Zee Studio) हे याचे सादरकर्ते असून,याची निर्मिती सलमान खान,सोहेल खान आणि रील लाईफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड (Reel Life Production Private Limited) यांनी केली आहे. अवश्य पाहा - उपाशी पोटी ऑडिशन देणारी नेहा झाली सुपरस्टार; पाहा ACP दिव्याची संघर्षगाथा सलमान खान याचा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा खजिना अशी चाहत्यांची खात्री असते. धमाकेदार गाणी,जबरदस्त अॅक्शन याचा या चित्रपटांमध्ये पुरेपूर वापर असतो. त्यामुळे सलमान खानचे चाहते आतुरतेनं वाट पाहत असतात. गेल्या काही वर्षांपासून सलमान खान दर वर्षी ईदच्या मुहूर्तावर आपला चित्रपट प्रदर्शित करतो. ही एक प्रथा पडून गेली आहे. त्यामुळं दर वर्षी चाहते ईदच्या मुहूर्तावर येणाऱ्या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेले असतात. गेल्या मार्चपासून देशात पसरलेल्या कोरोना साथीमुळं चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची मजा प्रेक्षकांना घेता आलेली नाही. कित्येक चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना साथीच्या संकटानं गांजलेल्या लोकांना यातून काही वेळासाठी का होईना पण सर्व विसरून मनमुराद आनंद देणाऱ्या मनोरंजनाची गरज आहे. त्यामुळं लोक चित्रपटगृहात जाऊन नवीन चित्रपट पाहण्यासाठी आसुसले आहेत. मे महिन्यात सलमानखानचा हा मनोरंजनाचा फुल पॅक असलेला चित्रपट त्यांची ही इच्छा पूर्ण करेल,पण तोपर्यंत मात्र प्रतीक्षा करणं भाग आहे.
    First published:

    Tags: Angry, Bollywood, Bollywood News, Salman khan, Shocking news, Upcoming movie

    पुढील बातम्या