बाॅक्स आॅफिसच्या शर्यतीत 'रेस 3' कितवा येणार?

बाॅक्स आॅफिसच्या शर्यतीत 'रेस 3' कितवा येणार?

हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरेल आणि पहिल्याच दिवशी 30 ते 35 कोटींची कमाई करेल असा ट्रेड अॅनालिस्टचा अंदाज आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून : ईदच्या मुहूर्तावर अॅक्शनमध्ये परतलेल्या सलमानने या आधी 'टायगर जिंदा है'मधून चाहत्यांची  मने जिंकलेली आहेत. तरी चाहत्यांना 'रेस 3'कडून खूप अपेक्षा आहेत. दबंग खानचा नवीन सिनेमा 'रेस 3' आज रिलीज झाला. बरेच दिवस सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या सिनेमाची भाईजानच्या फॅन्सला खूप प्रतिक्षा होती. रिलीजपासूनच हा सिनेमा मोठी कमाई करेल असे अंदाज बांधले जात आहेत. हा सिनेमा देशभरात 4300 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. दबंग खानवरचं चाहत्यांचं प्रेम बघता हा सिनेमा मोठी कमाई करेल अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा

किंग खानच्या 'झीरो'चा टीझर तुम्ही पाहिलात का?

'रेस 3' बॉक्स ऑफिसवर ब्लॉक बस्टर ठरेल असं ट्रेड अॅनालिस्टचं म्हणणं आहे. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी सिनेमाचं पोस्टर ट्विट करून सलमानला शुभेच्छा दिल्या आणि ब्लॉकबस्टर होण्याचा अंदाजही वर्तवला.

हा सिनेमा चाहत्यांच्या पसंतीस उतरेल आणि पहिल्याच दिवशी 30 ते 35 कोटींची कमाई करेल असा ट्रेंड अॅनालिस्टचा अंदाज आहे. आणि जर असं झालं तर 'रेस 3' हा 2018 या वर्षातील सर्वात शानदार ओपनिंग करणारा सिनेमा ठरेल. या सिनेमात सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल, डेी शाह महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. रेमो डिसुझाच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा रेस सीरिजमधील तिसरा सिनेमा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 04:32 PM IST

ताज्या बातम्या