मुंबई, 27 नोव्हेंबर : बॉलिवूडमध्ये सध्या बिग बजेट सिनेमाची चर्चा आहे. यातीलच एक म्हणजे सलमान खानचा सिनेमा ‘दबंग 3’ या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी काही दिवसांपूर्वी रिलीज झाले आहेत. हा सिनेमा सुद्धा येत्या 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. पण दरम्यान रिलीज होण्याआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमाबाबत सध्या वाद सुरू आहे आणि हा वाद इकता वाढला आहे की, आता या सिनेमावर बंदी आणावी अशी मागणी सगळीकडून केली जात आहे. हा वाद सुरू आहे तो सिनेमातील एका गाण्यामुळे. मेकर्सनी या गाण्यातून हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचवल्याचा आरोप केला जात आहे.
रिपब्लिक वर्ल्ड या वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार सलमान खानच्य़ा दबंग सिनेमाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं कोणतही सर्टिफिकेट देऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. या समितीचं म्हणणं आहे की, या सिनेमाचं टायटल सॉन्ग ‘हुड-हुड दबंग’मधून हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
बॉलिवूडचे हे कलाकार सेरोगसीच्या मदतीनं झाले आई-बाबा!
हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि झारखंडचे आयोजक सुनील घंवात यांनी यावर बोलताना सांगितलं, ‘दबंग 3 मधील गाणं ‘हुड-हुड दबंग’मध्ये ऋषींचा आपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यात ऋषींना सलमान खानसोबत वादग्रस्त स्थितीमध्ये डान्स करताना दाखवण्यात आलं आहे. ज्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.’
सुनील यांनी प्रश्न केला आहे की, हे लोक मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांनाही अशाच प्रकारे नाचताना दाखवण्याची हिंमत करतील का? त्यामुळे आता यावर सलमान खान किंवा सिनेमाचे मेकर्स यावर काय प्रतिक्रिया देतात. याची सर्वांना उत्सुकता आहे.
'अजित पवार म्हणजे धोबी का पप्पू' बॉलीवूड अभिनेत्याने उडवली खिल्ली
सलमान खानचा हा सिनेमा दबंग फ्रेंचाइजीचा तिसरा सिनेमा आहे. साउथ सुपरस्टार प्रभूदेवाचं दिग्दर्शन असलेल्या दबंग 3 मध्ये सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त चुलबुल पांडेच्या लाइफमध्ये आणखी एक प्रेयसी दिसणार आहे. या प्रेयसीची भूमिका अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिनं साकारली आहे. येत्या 20 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रणवीर सिंहचा ड्रेस घालून फसली बॉलिवूड अभिनेत्री, नेटकरी म्हणाले...
================================================================