सलमान खानच्या भारत सिनेमामुळे शेतकरी एका रात्रीत झाले लखपती

सलमान खानच्या भारत सिनेमामुळे शेतकरी एका रात्रीत झाले लखपती

भाईजान सलमान खान त्याच्या कामाईतून जास्तीत जास्त रक्कम चॅरिटी करत असतो. यावेळी त्याच्या शूटिंगमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी : बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या भारत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकताच त्याच्या भारत सिनेमाची पहिली झलक रिलीज केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच भाईजान फॅन्सना यंदा ईदला एक नवी मेजवानी मिळणार आहे. भाईजान सलमान खान त्याच्या कमाईच्या वाट्यातून समाजकार्य करत असतो हे सगळ्यांनाच माहित आहे. पण यावेळी त्याच्या शूटिंग दरम्यान शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंजाबमधील लुधियाणाचे शेतकरी सलमानच्या भारतमुळे लखपती झाले आहेत.

या सिनेमात भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनाचा मुद्दा दर्शवण्यात येणार आहे. हा मुद्दा सिनेमाचा महत्त्वाचा घटक दाखवला आहे. या सीनमुळे टीमला फार मेहनत करावी लागली. कारण हा सीन वाघा बॉर्डरवर चित्रित करण्याचं ठरलं होतं. सुरक्षेच्या प्रश्नामुळे BSF ने वाघा बॉर्डरवर शूटिंगला परवानगी दिली नाही.

BSF ने परवानगी न दिल्यामुळे सिनेमाच्या टीमला लुधियाणातील बल्लोवाला गावात वाघा वॉर्डरचा सेट उभारावा लागला. सेट उभारण्यासाठी गावातील काही शेतकऱ्यांकडून जमीन भाड्याने घेण्यात आली. वाघा बॉर्डरचा सेट प्रचंड मोठा असल्याने जास्त शेतजमीन लागणार होती.

सिनेमाचा सेट उभारण्यासाठी 19 एकर जमीन शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर घेण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येकी एक एकर जमिनीचे 80  हजार रुपये देण्यात आले. त्यामुळे लुधियाणाच्या शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांचा फायदा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

@bharat_thefilm @aliabbaszafar @katrinakaif @dishapatani @whosunilgrover @atulreellife

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमानच्या भारत सिनमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफरने केलं आहे.सिनेमाच्या कास्टिंगबद्दल याआधीसुद्धा माहिती देण्यात आली होती. अभिनेता जॅकी श्रॉफच्या भूमिकेचं नाव महाभारत असं आहे. सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ करताना दिसेल. भारतची पहिली बायको स्मृतीचा रोल अभिनेत्री तब्बू साकारणार आहे. चित्रपटातील महत्त्वाची बाब म्हणजे सलमान खान या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतची मुलगी राधाची भूमिका अभिनेत्री दिशा पाटनी करणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा रोमांस या सिनेमात पहायला मिळणार आहे.

First published: January 27, 2019, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading