Home /News /entertainment /

सलमान खानचं कुटुंबही एका क्रिकेट टीमचं मालक; टीममध्ये वेस्ट इंडिजचा ‘हा’ खेळाडू

सलमान खानचं कुटुंबही एका क्रिकेट टीमचं मालक; टीममध्ये वेस्ट इंडिजचा ‘हा’ खेळाडू

बॉलिवूडच्या इतर बड्या स्टार्स प्रमाणेच सलमान खान(Salman Khan)च्या कुटुंबानेही आता एक क्रिकेट टीम विकत घेतली आहे. त्यांच्या टीममध्ये वेस्ट इंडिजच्या एका दिग्गज खेळाडूचाही सहभाग आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर:  बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन्ही विश्वांचे गेल्या अनेक वर्षांपासून जवळचे संबंध आहेत. कधी कोणत्या लव्ह अफेअरमुळे तर कधी क्रिकेटवर निघालेल्या एखाद्या सिनेमामुळे बॉलिवू़ड आणि क्रिकेटचं नातं जोडलं जातं. आयपीएल (Indian Premier League)मध्येही अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी क्रिकेटच्या संघाची मालकी पत्करली आहे. शाहरुख खान(Shah rukh Khan), प्रीती झिंटा (Preity Zinta) या कलाकारांसोबतच आता सलमान खान (Salman Khan)च्या एका भावाचं नावही या यादीत सामील झालं आहे. सलमानचा छोटा भाऊ सोहेल खान (Sohail Khan) यानेही श्रीलंकेत होणाऱ्या क्रिकेट लीगची मालकी स्वीकारली आहे. भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्याच धर्तीवर श्रीलंकेत ‘श्रीलंका प्रीमिअर लीग’ सुरु होणार आहे. सोहेल ‘कँडी टस्कर्स’ (Kandy Tuskers) टीमचा मालक सोहेल खानने 'कँडी टस्कर्स' ही टीम विकत घेतली आहे. त्यात सलीम खान आणि सलमान खानचाही काही प्रमाणात हिस्सा आहे. 21 नोव्हेंबरपासून श्रीलंका प्रीमिअर लीग सुरू होणार आहे. यामध्ये 5 टीम्सचा एकमेकांशी सामना होणार आहे. सोहेलच्या टीममध्ये क्रिस गेल श्रीलंका प्रीमिअर लीगमध्ये ‘कँडी टस्कर्स’ (Kandy Tuskers)चा सामना कोलंबो किंग्स (Colombo Kings), दांबुला हॉक्स (Dambulla Hawks), गेल ग्लेडिएटर्स (Galle Gladiators) आणि जाफना स्टालियन्स (Jaffna Stallions) या टीम्ससोबत होणार आहे. विशेष म्हणजे, सोहेल खानच्या टीममध्ये क्रिस गेल हा वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडूदेखील आहे. आता आयपीएलप्रमाणे यंदाच्या श्रीलंका प्रीमिअर लीगला क्रीडाप्रेमींचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: IPL 2020, Salman khan

    पुढील बातम्या