मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Salman Khan : 'सिगारेटचे चटके देत मारहाण करत..'; सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे गंभीर आरोप

Salman Khan : 'सिगारेटचे चटके देत मारहाण करत..'; सलमान खानवर एक्स गर्लफ्रेंडचे गंभीर आरोप

सलमान खान

सलमान खान

सलमान खानवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने गंभीर आरोप केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 2 डिसेंबर : बॉलिवूडचा भाईजान  सलमान खान कायमच चर्चेंच्या केंद्रस्थानी असतो. तो अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असतो. लग्नाच्या विषयावरुन तर त्याचं नेहमीच कोणासोबत तरी नाव जोडलं जातं. याशिवाय तो त्याच्या एक्स गर्लफ्रेंडमुळेही कायम प्रकाश झोतात येत असतो. नुकतंच सलमान खानवर त्याच्या एक्स गर्लफ्रेंड अभिनेत्री सोमी अलीने गंभीर आरोप केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने सलमान खानसोबतचा तिचा जुना फोटो शेअर करत पुन्हा एकदा अभिनेत्यावर निशाणा साधला आहे. सोमी अलीने सलमान खानवर मारहाणीचा आरोप केला आणि काही वेळाने ती पोस्ट हटवली. इतकेच नाही तर सोमी अलीने सलमान खानला सपोर्ट करणाऱ्या अभिनेत्रींवरही ताशेरे ओढले. या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा -  सलमान खानच्या हजारो कोटी रुपयांच्या संपत्तीला वारस कोण? अभिनेत्याने स्वत:च दिलं उत्तर

सोमी अलीनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलमान तिला गुलाबाचं फुल देताना दिसत आहे. या फोटोसोबत अभिनेत्रीनं लिहिलं, 'खूप काही घडणार आहे. माझ्या शोवर भारतात बंदी घालण्यात आली आणि नंतर मला खटला भरण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस माझे रक्षण करण्यासाठी येथे 50 वकील उभे आहेत, जे मला सिगारेटने जाळण्यापासून आणि वर्षानुवर्षे माझ्यावर होणाऱ्या शारीरिक अत्याचारापासून वाचवतील.'

सोमीने पुढे लिहिलं, 'महिलांवर अत्याचार करणाऱ्या या पुरुषाचे समर्थन करणाऱ्या सर्व महिला अभिनेत्रींची लाज वाटते. अशा अभिनेत्रींनाही लाज वाटली पाहिजे, ज्यांनी याचे समर्थन केलं. आता आर की पारची लढाई आहे.' सोमी अलीची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागली आहे. त्यामुळे आता सलमानच्या अडणचणी वाढणार असल्याचं पहायला मिळतंय.

सोमी अलीने सलमान खानवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापहिलेही अभिनेत्रीने सलमानवर अनेकदा निशाणा साधला आहे. अनेकवेळा गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच त्याने सलमान खानचे नाव न घेता त्याच्यावर मारहाणीचा आरोपही केला होता. दोघेही 90 च्या दशकात रिलेशनशीपमध्ये होते. दोघेही अनेक जाहिरातींमध्ये एकत्र दिसले होते. मात्र सलमान आणि सोमीचं नातं फार काळ टीकू शकलं नाही.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Salman khan