मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी धावून आला सलमान खान, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

सलमाननं मुंबई पोलिसांची मदत केली असून त्याच्या या कामाचं कौतुक करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचे आभार मानले आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 मे : देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे लोकांना मात्र अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात अनेक बॉलिवूड कलाकार देशातील जनतेच्या मदतीसाठी धावून आले आहेत. ज्यात सोनू सूद आणि सलमान खानचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे. एकीकडे सोनू सूद प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करत असताना सलमाननं सुद्धा पुन्हा एकदा आपला उदारपणा दाखवत मुंबई पोलिसांची पुन्हा एकदा मदत केली आहे. मुंबई पोलीसांना 1 लाख हॅन्ड सॅनिटायझरचं वाटप सलमाननं केलं आहे. त्याच्या या कामाचं कौतुक करत महाराष्ट्र सीएम उद्धव ठाकरे यांनी त्याचे आभार मानले आहेत.

सीएम उद्धव ठाकरे यांनी सलमान खानचे आभार मानत एक ट्वीटर पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलं, धन्यवाद सलमान खान आमच्या मुंबई पोलीसांना एक लाख सॅनिटायझर दिल्याबद्दल तुझे आभार. उद्धव ठाकरेंचं या ट्वीटवर प्रतिक्रिया देत सलमाननं त्यांना धन्यवाद दिले आहेत. उद्धव ठाकरेंच्या या ट्वीटवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या कमेंटमध्ये सर्वजण सलमानचं कौतुक करत आहेत.

कोरोना योद्ध्यांना आणि कोरोना संक्रमितांना किंवा जनतेला मदत करण्याची सलमानची ही पहिलीच वेळ नाही. अगदी सुरुवतीपासूनच सलमाननं सर्वांना मदत केली आहे. त्यानं इंडस्ट्रीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांना मदत केली. याशिवाय बीइंग हंग्री या फुड ट्रकच्या माध्यमातून लोकांना अन्न पुरवण्याचं काम केलं आहे. याशिवाय ईदच्या दिवशी सुद्धा त्यानं अन्नदान केलं आहे.

सोनू सूदकडे लोक काय मागतील याचा नेम नाही! या गोड चिमुरडीचा VIDEO पाहाच

तापसी पन्नूवर कोसळला दुःखाचा डोंगर, खास व्यक्तीनं घेतला जगाचा निरोप

First published: May 31, 2020, 1:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading