Elec-widget

इन्शाल्ला!! 10 वर्षांनी सलमान-भन्साळीला मिळालं एकत्र यायचं निमित्त

इन्शाल्ला!! 10 वर्षांनी सलमान-भन्साळीला मिळालं एकत्र यायचं निमित्त

एक महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे सल्लूमियाँ बाॅलिवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर 10 वर्षांनी सिनेमा करतोय.

  • Share this:

मुंबई, 5 सप्टेंबर : बिग बाॅस 12 गोव्यामध्ये दणक्यात लाँच झाला. यावेळी सलमान खाननं मीडियाशी दिलखुलास गप्पा मारल्या. सलमानकडून अनेक बातम्याही कळल्या. एक महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे सल्लूमियाँ बाॅलिवूडच्या एका मोठ्या दिग्दर्शकाबरोबर 10 वर्षांनी सिनेमा करतोय.

हो, तो दिग्दर्शक आहे संजय लीला भन्साळी. सलमान म्हणाला, ' मी संजयबरोबर सिनेमा करतोय.' पण पुढे तो असंही म्हणाला, ' संजय माझा फोन उचलत नाहीय. प्लीज त्याला माझ्याशी बोलायला सांगा.'

टाइम्स आॅफ इंडियाच्या बातमीनुसार संजय लीला भन्साळी सलमानला घेऊन इन्शाल्ला सिनेमा करतोय. हा सिनेमा 2020मध्ये रिलीज होईल. संजय लीला भन्साळीसोबत सलमाननं हम दिल दे चुके सनम, खामोशी हे सिनेमे केले होते. आता पुन्हा 10 वर्षांनी सलमान भन्साळीबरोबर काम करेल.

भन्साळी गँगस्टर सिनेमा बनवतोय. गंगुबाई कोठेवाली या गँगस्टरच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. सध्या पटकथेवर काम सुरू आहे. बऱ्याचदा एखाद्या कलाकाराला समोर ठेवून स्क्रीप्ट लिहिलं जातं. आणि तसंच काम सुरू होतं. पण प्रियांकानं आता संजय लीला भन्साळीलाही गुडबाय केलंय. त्यामुळे तो जाम भडकलाय.

'भारत'चं शूटिंग जोरात सुरू आहे. प्रियांका चोप्राच्या जागी कतरिना कैफ आली. 'भारत'मध्ये आता आपल्याला कतरिना आणि सलमान खान दिसणार आहे. प्रियांकाचा विषय आता संपलाय. कॅट आणि सलमानचं प्रेम पुन्हा बहरणार असं दिसतंय. कारण सलमाननं फेसबुकवर सुशील कन्या असा कतरिनाचा उल्लेख केला होता. आता भारतसाठी तर प्रियांका नक्की झाली होती. ऐनवेळी कतरिनाला विचारलं आणि तिनं कुठलाच इगो प्राॅब्लेम न आणता पटकन हो म्हटलं.

Loading...

'भारत'चा एक पहिला फोटो बाहेर आलाय. त्यात सलमानच्या बाहुपाशात कतरिना आहे. खुद्द सलमाननं हा फोटो ट्विट केलाय. सिनेमाचं शूटिंग माल्टा इथे सुरू आहे. दोघंही भारतीय पोशाखात आहेत. ते एकमेकांसोबत खूप सुंदर दिसतायत.

Teacher's Day : असे फिल्मी शिक्षक खऱ्या आयुष्यात भेटले तर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...