मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /राधेमुळे नाही तर यासाठी KRK वर झाली केस; सलमानच्या वकीलाने केला खुलासा

राधेमुळे नाही तर यासाठी KRK वर झाली केस; सलमानच्या वकीलाने केला खुलासा

सलमान खानच्या वकिलाने केआरके वर केस करण्याचं खरं कारण सांगितलं आहे.

सलमान खानच्या वकिलाने केआरके वर केस करण्याचं खरं कारण सांगितलं आहे.

सलमान खानच्या वकिलाने केआरके वर केस करण्याचं खरं कारण सांगितलं आहे.

मुंबई 27 मे : नुकतच स्वयंघोषित समिक्षक तसेच अभिनेता कमाल आर खान (Kamal R Khan) आणि सलमान (Salman Khan) यांच्यातील एक वाद समोर आला होता. तर सलमान खान ने त्याचा बहूचर्चित चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted Bhai) या चित्रपटावर कमाल खान ने दिलेल्या नकारात्मक समिक्षेमुळे त्याच्यावर कारवाई केली अस कमाल खान अर्थात केआरके (KRK)  ने म्हटलं होत. तर त्याने अनेक ट्वीट्स करत माहिती दिली होती. पण आता हे सगळं खोटं असल्याचं समोर येत आहे. व सलमान खानच्या वकिलाने याबाबत खुलासा केला आहे.

राधे चित्रपटाच्या रिव्हू साठी नाही तर कमाल खान ने सलमान खान आणि त्याच्या अनेक गोष्टींविरोधात केलेल्या बदनामीमुळे मानहानीची केस करण्यात आली आहे. यात त्याच्या वकिलाने म्हटलं आहे की, ‘कमाल खान सातत्याने सलमान खानची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोपही करत आहे. याशिवाय तो सलमान खानचा ब्रँड बीइंग ह्युमनलाही (Being Human) फ्रॉड म्हटला आहे. तसेच या ब्रँडतर्फे पैसे दाबले गेले असही त्याने म्हटलं होत.’

पुढे त्याने आणखीही बदनामी केली होती, ‘सलमान खान आणि सलमान खान फिल्म्स (Salman Khan Films) हे एक गुंड आहेत. असही त्याने म्हटलं होत. तसेच गेल्या काही महिन्यापांसून तो सातत्याने सलमान खानची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे.’ असं सलमान खानच्या वकिलाने म्हटंल आहे.

'मी तेव्हा 35 वर्षांचा होतो...'; 'ऐ दिल है मुश्कील' मधील तो प्रसंग करण जोहरच्या आयुष्यावर आधारीत

यानंतर केआरकेच्या वकीलाने ही स्टेटमेंट देत म्हटलं आहे, ‘कमाल आर खान पुढे पुढील तारखे पर्यत कोणतीही अपमानजनक पोस्ट सोशल मीडियावर करणार नाही.’ त्यामुळे राधेच्या रिव्हूमुळे नाही तर केआरके ने सलमान खानची वैयक्तिक रित्या केलेल्या बदनामीमुळे त्याच्यावर मानहानीची केस करण्यात आली आहे.

केआरके ने यानंतर ट्वीचट्सची सीरिजच सुरू केली आहे. व लेटेस्ट ट्वीट मध्ये त्याने म्हटलं आहे की, ‘कोर्टाने मला सलमान खान किंवा त्याच्या लीगल टीम विषयी बोलण्याची परवानगी दिली नाही त्यामुळे आता मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही पण पुढील सुनावनीनंतर एक 7 मीनिटांच्या व्हिडीओ मध्ये उत्तर देणार’ असल्याचं त्याने म्हटंल आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Salman khan