Home /News /entertainment /

सलमान खानने शेजाऱ्याविरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला, काय आहे नेमकं प्रकरण

सलमान खानने शेजाऱ्याविरुद्ध दाखल केला मानहानीचा खटला, काय आहे नेमकं प्रकरण

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानने ( Salman Khan ) मुंबईतील मालाड येथील रहिवासी केतन कक्कर ( Ketan Kakkar ) याच्या विरोधात मानहानीचा खटला ( defamation case ) दाखल केलाय.

      मुंबई, 15 जानेवारी-   बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानने   ( Salman Khan )   मुंबईतील मालाड येथील रहिवासी केतन कक्कर ( Ketan Kakkar )  याच्या विरोधात मानहानीचा खटला  ( defamation case )  दाखल केलाय. सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊस   (Panvel farmhouse )   शेजारी असणाऱ्या एका डोंगराळ जमिनचा केतन मालक आहेत. सलमानचा असा आरोप आहे की, 'एका यूट्यूब चॅनलसाठी मुलाखत देताना केतनने त्याची बदनामी केली.' या शोचा भाग असलेल्या इतर दोन जणांना याच प्रकरणात पक्षकार (party in this case ) करण्यात आले होते. याशिवाय गुगल, यूट्यूब, ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया कंपन्यांनाही पक्षकार करण्यात आलं आहे. 'संबंधित कंपन्यांनी त्यांच्या साईट्सवरील त्याच्याविरोधातील अपमानास्पद मजकूर काढून टाकावा,' अशी सलमान खानची इच्छा आहे. इंडिया टुडे मधील वृत्तानुसार, सलमानच्या याचिकेत म्हटलं आहे की, 'न्यायालयाने तात्पुरत्या आदेशाद्वारे, ' बदनामीकारक सामग्री किंवा अपमानास्पद मजकूर हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लोड/अपलोड करणं, पोस्ट करणं, ट्विट करणं, रीट्विट करणं, मुलाखत देणं, होस्ट करणं, प्रिंट करणं, प्रकाशित करणं, प्रसारण करणं आदींबाबत कम्युनिकेशन करण्यास रोखले पाहिजे.' मनाई हुकूम जारी करण्याची विनंती- याप्रकरणी काल, शुक्रवारी (14 जानेवारी) सिटी सिव्हिल कोर्टामध्ये न्यायाधीश अनिल एच लद्दाद यांच्या समोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान डीएसके लीगल नावाच्या कायदेशीर कंपनीच्या वकिलांनी सलमानची बाजू न्यायालयात मांडली. या वकिलांनी केतन कक्कर यांच्याविरुद्ध मनाई हुकूम जारी करण्याची विनंती न्यायालयाला केली. केतन यांच्या वकिलांनी मागितला वेळ- तर, न्यायालयात केतन कक्कर यांची बाजू वकील आभा सिंग आणि आदित्य प्रताप यांनी मांडली. त्यांनी सलमान खान याच्या वकिलांनी न्यायालयात मांडलेल्या बाजुला विरोध दर्शवला. ते म्हणाले की, 'आम्हाला काल संध्याकाळी या केसची कागदपत्रे मिळाली आहेत. हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी वेळही मिळाला नाही. सलमान खटला दाखल करण्यासाठी महिनाभर वाट पाहत असेल, तर नक्कीच केतन कक्करला उत्तर देण्यासाठी थोडा वेळ द्यावा.' 21 जानेवारी पुढील सुनावणी- दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कक्कर यांच्या वकिलांची विनंती मान्य करीत त्यांना थोडा वेळ दिला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे. सलमान खानचा फॅन क्लब हा खूप मोठा आहे. त्यामुळे आता या प्रकरणी 21 जानेवारीला न्यायालयात काय होणार, याकडे सलमान खानच्या चाहत्यांसह अनेकांचे लक्ष लागले आहे.
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Salman khan

    पुढील बातम्या