20 वर्षांनी सलमान थिरकला 'ओ ओ जाने जाना'वर, Video व्हायरल

20 वर्षांनी सलमान थिरकला 'ओ ओ जाने जाना'वर, Video व्हायरल

सल्लूमियाँ थायलंडला एका लग्नासाठी गेला होता. तिथे त्यानं उपस्थितांना वेडंच केलं.

  • Share this:

मुंबई, 4 डिसेंबर : बाॅलिवूड सुपरस्टार सलमान खान आत्तापर्यंत भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. तो दीपवीर आणि प्रियांका-निकच्या लग्नालाही आला नव्हता. पण सल्लूमियाँ थायलंडला एका लग्नासाठी गेला होता. तिथे त्यानं उपस्थितांना वेडंच केलं.

थायलंडला सलमान खान एका लग्नासाठी गेला होता. तिथे गायक कमाल खान ओ ओ जाने जाना गाणं गात होता. त्यावर सलमाननं न राहवून तो स्टेजवर आला आणि त्यानं या गाण्यावर स्टेप्स केल्या. उपस्थितांनी तर जल्लोषच केला. सलमाननं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
1998मध्ये सलमानचं हे गाणं लोकप्रिय झालं होतं. 20 वर्षांनी या गाण्याची जादू पुन्हा एकदा चालली.


सध्या भारतची चर्चा खूप आहे. चित्रपटाच्या चौथ्या शेड्युलचं शूट सुरू असताना सलमानच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आत्तापर्यंत या चित्रपटातील भूमिकांचे फोटोज व्हायरल होताना दिसत होते. मात्र आता सलमानचा शूटिंग दरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात सलमान चेक्स शर्टमध्ये आपल्या फॅन्ससोबत दिसला आहे. सलमानच्या हेअर स्टाईलकडे पाहिलं तर याआधी बजरंगी भाईजान या सिनेमात त्याची अशी हेअर स्टाईल दिसून आली होती. आणि आता भारत चित्रपटात तो अशाच लूकमध्ये दिसणार आहे.

भाईजान सलमान या चित्रपटात पाच वेगवेगळ्या वयोगटातील भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या भूमिकेत सलमान दिसेल. भारत हा चित्रपट कोरियन सिनेमा हिंदी रिमेक आहे. 'ऑड टू माय फादर' असं त्या चित्रपटाचं नाव आहे.

सिनेमाच्या कास्टिंगबद्दल याआधीसुद्धा माहिती देण्यात आली होती. अभिनेता जॅकी श्रॉफच्या भूमिकेचं नाव महाभारत असं आहे. सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ करताना दिसेल. भारतची पहिली बायको स्मृतीचा रोल अभिनेत्री तब्बू साकारणार आहे. चित्रपटातील महत्त्वाची बाब म्हणजे सलमान खान या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतची मुलगी राधाची भूमिका अभिनेत्री दिशा पाटनी करणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफ आणि सलमान खान यांचा रोमांस या सिनेमात पहायला मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 04:28 PM IST

ताज्या बातम्या