सलमान खान आणि व्यंकटेश डग्गुबतीचा 'जुम्मे की रात'वर डान्स, व्हिडीओ व्हायरल

सलमान खान आणि व्यंकटेश डग्गुबतीचा 'जुम्मे की रात'वर डान्स, व्हिडीओ व्हायरल

व्यंकटेश डग्गुबतीच्या मोठ्या मुलीच्या लग्नाला सलमाननं हजेरी लावली होती. यावेळी सलमान आपल्या युनिक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसला.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान दाक्षिणात्य सुपरस्टार व्यंकटेश डग्गुबतीसोबत स्वतःचंच सुपरहिट गाणं 'जुम्मे की रात'वर डान्स करताना दिसत आहे. दोन्ही सुपरस्टार्सचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरलेला दिसत आहे. व्यंकटेश डग्गुबतीच्या मोठ्या मुलीच्या लग्न सोहळ्याला सलमाननं हजेरी लावली होती. यावेळी सलमाननं आपल्या युनिक स्टाईलमध्ये डान्स करताना दिसला आणि त्याला व्यंकटेश डग्गुबतीनंही चांगली साथ दिली. सलमान खान व्यतिरिक्त या लग्नाला प्रसिद्ध अभिनेत्री बीना काक यांनीही हजेरी लावली होती.अभिनेत्री बीना काक यांनी लग्नसोहळ्यातील काही फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले. यात बीना यांच्यासोबत सलमान खान, व्यंकटेश डग्गुबती, बाहुबली फेम राणा डग्गुबती आणि इतर स्टारही दिसत आहे. याशिवाय या विवाह सोहळ्याला दाक्षिणात्य स्टार नागा चैतन्य आणि त्याची पत्नी समांता रुथ प्रभु हे देखील उपस्थित होते. 

View this post on Instagram
 

Congratulations Venky ! @venkateshdaggubati


A post shared by Bina Kak (@kakbina) on

व्यंकटेश डग्गुबतीची मुलगी आश्रिता आणि विनायक रेड्डी यांचा साखरपुडा 6 फेब्रुवारीला जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला होता. आश्रिता ही फुड ब्लॉगर आहे तर विनायक रेड्डी हा आर सुरेंद्र रेड्डी यांचा नातू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या