साधी गोष्ट कळत नाही! Dabangg 3 च्या ट्रेलरमध्ये मोठी चूक

साधी गोष्ट कळत नाही! Dabangg 3 च्या ट्रेलरमध्ये मोठी चूक

‘दबंग 3’च्या ट्रेलरमध्ये अशी चूक झाली आहे जी ना सलमानला समजली आणि ना मेकर्सच्या लक्षात आली.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : बॉलिवूडमध्ये सध्या बरेच नवे आणि बिग बजेट सिनेमा रिलीज होत आहेत. अशातच सलमानचा आगामी सिनेमा ‘दबंग 3’ अचानक चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमा ट्रेलर रिलीज झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला मात्र हाच ट्रेलर आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘दबंग 3’ हा ट्रेलर आता सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे आणि या ट्रोलिंगचं कारण ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अशी चूक झाली आहे जी ना सलमानला समजली आणि ना मेकर्सच्या लक्षात आली.

‘दबंग 3’च्या मेकर्सच्या एका चुकीमुळे ट्रेलरची सोशल मीडियावर प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. या सिनेमाच्या ट्रेलरच्या शेवटी ज्या ठीकाणी सिनेमाची रिलीज डेट देण्यात आली आहे. त्या ठिकाणी डिसेंबरचं स्पेलिंग चुकीचं लिहिण्यात आलं आहे. सलमान खानच्या मोस्ट अवेटेड सिनेमात लोकांनी ही चूक पाहिल्यावर त्यांनी थेट सलमानलाच याबद्दल विचारायला सुरुवात केली आहे. अनेकांनी तर याचे स्क्रीनशॉट काढून सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे.

सोनाक्षी सिन्हानं चोरला मलायका अरोराचा ड्रेस, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

एका युजरनं लिहिलं, पहिलं फिजिक्स बरबाद केलं आणि आता इंग्रजीची वेळ आहे... ‘DECEMEBER’ भाई तू खरंच महान आहेस. तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, इंग्रजीला माझी श्रद्धांजली. आणखी एका युजरनं लिहिलं, दबंग 3च्या टीमच्या बेजबाबदारपणाचा कळस या ट्रेलरमध्ये डिसेंबरचं स्पेलिंग पाहा. ट्विटरवर #Dabangg3 आणि #Dabangg3Trailer हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. मात्र या एका चुकीनं दबंग 3च्या टीमला शरमेनं मान खाली घालायला लावली आहे.

आर्चीच्या प्रेमातला गावरान परश्या बदलला, मेकओव्हरनंतरचा नवा लुक पाहिला का?

‘दबंग 3’मध्ये सलमान खान व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान दिसणार आहेत. तसेच मराठी सिने इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करत आहेत. हा सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होत असून याचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभुदेवा करत आहे.

KBC 11: बायकोला मंगळसूत्र घेऊन देण्यासाठी तो पोहोचला हॉट सीटवर आणि....

========================================================

VIDEO : 'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

Published by: Megha Jethe
First published: October 25, 2019, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading