'या' सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमान खान पोहोचला जन्मगावी

'या' सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमान खान पोहोचला जन्मगावी

इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत सलमाननं सिनेमाच्या शूटिंगसाठी इंदोरला रवाना झाल्याची माहीती दिली.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित सिनेमा भारतचं शूटिंग काही दिवसांपूर्वीच संपलं. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. यानंतर सलमान खान लगेचच आगामी सिनेमा दबंग 3च्या शूटिंगला सुरुवात करत आहे आणि यासाठी सलमान आज त्याच्या जन्मगावी म्हणजेच इंदोरला रवाना झाला. याची माहिती सलमाननं सोशल मीडियावरुन दिली. त्यानं नुकताच एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यात सलमानसोबत त्याचा भाऊ अरबाज खान सुद्धा दिसत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सलमाननं या ठिकाणाचं महत्व सांगताना दिसत आहे. सलमान सांगतो, 'मी आणि अरबाज इंदोरला पोहोचलो आहोत. आम्ही दबंग 3च्या शूटिंगसाठी मंडलेश्वर आणि महेश्वर जाणार आहोत. ज्या ठिकाणी आमच्या आजोबांची पोस्टिंग होती. ज्यावेळी ते पोलिस दलात कार्यरत होते.' या व्हिडीओसोबत पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'बॅक इन आर बर्थप्लेस फॉर दबंग 3' असं लिहिलं आहे.
 

View this post on Instagram
 

Back in our birthplace for #Dabangg3 shoot @arbaazkhanofficial


A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

दबंग 3चं दिग्दर्शन यावेळी प्रभू देवा करत असून सिनेमाची निर्मिती अरबाज आणि सलमानच्या बॅनरखाली होणार आहे. दबंगच्या इतर दोन भागाप्रमाणेच या भागातही सोनाक्षी सिन्हाच सलमान सोबत दिसणार आहे. दबंग सीरीज मधील पहिला भाग 2010मध्ये रिलीज झाला होता याच दिग्दर्शन अभिनव कश्यापनं केलं होतं. तर2012 मध्ये रिलीज झालेल्या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शन अरबाज खाननं केलं होतं आणि हे दोन्ही सिनेमे सुपरहिट झाले होते. त्यानंतर आता येत असलेला दबंग 3 याच वर्षी 3 डिसेंबरला रिलीज होणार आहे. पण याच महिन्यात 6 डिसेंबरला मल्टीस्टारर सिनेमा पानीपत आणि रणबीर- आलियाचा ब्रह्मास्त्र सुद्धा रिलीज होत आहे. त्यामुळे या तिन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.
 

View this post on Instagram
 

Launching @beingstrongindia for all your fitness needs! Let’s #BeStrong together! Video Credits: @haiderkhanhaider


A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 02:40 PM IST

ताज्या बातम्या