बॉलिवूडमध्ये 31 वर्षं पूर्ण करणाऱ्या या सुपरस्टार अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

बॉलिवूडमध्ये 31 वर्षं पूर्ण करणाऱ्या या सुपरस्टार अभिनेत्याला तुम्ही ओळखलं का?

या अभिनेत्यानं नुकतीच बॉलिवूडमध्ये 31 वर्षं पूर्ण केली असून आजही सध्याच्या नव्या अभिनेत्यांवर तो भारी पडताना दिसतो.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवे चेहरे येतात. काहींना प्रचंड यश मिळतं तर काही थोड्याफार कालावधीत या इंडस्ट्रीमधून गायब होतात. पण आजही बॉलिवूडमध्ये काही असे अभिनेते आहेत ज्यांनी या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं योगदान दिलं आहे. जे आजच्या नव्या अभिनेत्यांनाही अद्याप टक्कर देत आहेत. असाच एक प्रसिद्ध अभिनेता म्हणजे सलमान खान. मैंने प्यार किया या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये नुकतीच 31 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं त्यानं आपला बालपणीचा एक फोटो शेअर करत सर्वांचे आभार मानले.

सलमाननं त्याच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर बालपणीचा एक फोटो शेअर करताना लिहिलं, ‘माझ्या 31 वर्षांच्या बॉलिवूड प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व चाहते आणि माझे हितचिंतक यांनी माझ्या या प्रवासात मला साथ दिली त्याबद्दल त्यांचेही आभार.’ सलमान खान सध्या ‘दबंग 3’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो तब्बल 20 वर्षांनंतर संजय लीला भन्साळींसोबत ‘इन्शाअल्लाह’मध्ये काम करणार होता. मात्र आता हा सिनेमा रिलीज होणार नसल्याचं समजतं. सलमानच्या मागण्या भन्साळींनी अमान्य केल्यानं त्यानं हा सिनेमा सोडला असल्याची चर्चा आहे.

ब्रेकअपच्या चर्चांनंतर आमिर खानच्या लेकीनं शेअर केला बॉयफ्रेंड सोबतचा 'तो' फोटो

 

View this post on Instagram

 

A bigg thank u to the Indian film industry n to every 1 who has been a part of this 31 year journey specially all my fans and well wishers who have made this amazing journey possible . .

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सलमाननं या सिनेमासाठी 125 दिवसं देण्याचं कबूल केलं होतं मात्र भन्साळींच्या मते सिनेमाचं शूट पूर्ण व्हायला जवळपास 8 महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे ते सलमानच्या मागणीनुसार हा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज करु शकत नव्हते. या सर्व कारणांमुळे हा सिनेमा आता बंद पडल्यात जमा आहे. मात्र याबाबत सलमान आणि भन्साळी यांच्यापैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कतरिनापासून करिनापर्यंत मोठ्या फॅशन वीकमध्ये मलायका ठरली Hot शो स्टॉपर

सलमाननं फक्त यावर मी इतर सिनेमांना सुद्धा डेट दिलेल्या असल्यानं या सिनेमासाठी अतिरिक्त वेळ काढू शकत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भन्साळी कलाकारांची आणि त्याच्या सल्ल्यांचा आदर करतात मात्र सिनेमाच्या कथेशी ते कोणत्याही प्रकारची तडजोड करत नाही असंही सलमाननं म्हटलं आहे. मात्र आमच्यात कोणतेही वाद नाहीत असं सांगायलाही तो विरसला नाही.

 

View this post on Instagram

 

Woh mere peche wire kis cheez ka hai . . Can u guess pls?

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

सध्या सलमान ‘दबंग 3’ त्याआधी रिलीज झालेला त्याचा ‘भारत’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान चालला. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि दिशा पाटनी या अभिनेत्री होत्या. याशिवाय ‘दबंग 3’ नंतर सलमान अतुल अग्नीहोत्रीसोबत एक सिनेमा करणार आहे. ज्याची डिटेल्स तो सध्याचं त्याचं शूट पूर्ण झाल्यावर करण्याची शक्यता आहे.

क्रिकेटपटू आणि आलियामध्ये रंगले GIF वॉर, चर्चा मुंबईपासून केपटाऊनपर्यंत!

=============================================================

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 12:17 PM IST

ताज्या बातम्या