सलमानच्या फॅन्ससाठी वाईट बातमी, 'दबंग 3'ची रिलीज डेट बदलली

सलमानच्या फॅन्ससाठी वाईट बातमी, 'दबंग 3'ची रिलीज डेट बदलली

सलमान खानच्या 'दबंग 3'चं शूटिंग सुरू होणार आहे. पण रिलीजच्या दृष्टीनं फार बरी बातमी नाहीय.

  • Share this:

मुंबई, 12 नोव्हेंबर : 2018 बाॅलिवूडसाठी खूप चांगलं होतं. अनेक चांगले सिनेमे रिलीज झाले. पण सलमान आणि शाहरुखसाठी हे वर्ष तसं ठीकठाकच राहिलंय. सलमान खानच्या 'दबंग 3'चं शूटिंग सुरू होणार आहे. पण रिलीजच्या दृष्टीनं फार बरी बातमी नाहीय.


'दबंग 3'मध्ये सलमान खानची भूमिका आहे. शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. पण सिनेमाची रिलीज डेट बदलली आहे. आमिर खानच्या 'ठग्स आॅफ हिंदोस्तान'ची परिस्थिती पाहता हा सलमानची चिंता वाढलीय. त्यामुळे आता दबंग 3 सिनेमा 2020च्या ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.


सलमाननं टीमला सांगितलंय की पटकथेवर चांगल्या प्रकारे काम करा. सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करणार आहे. सिनेमात सोनाक्षी सिन्हा आणि अरबाज खान आहेत.


अरबाज खानच्या 'दबंग-3' सिनेमात मलायका पुन्हा एकदा झळकणार आहे. 'दबंग-3'मध्ये मी आयटम साँगच्या व्यतिरिक्त अभिनय सुद्धा करणार असल्याचं मलायकाने एका मुलाखतीमध्ये सांगितलंय. या सिनेमासाठी दोन अभिनेत्री एकत्र काम करतील असंही अरबाजने म्हटल होतं.


'दबंग सिनेमांच्या सीरिजमध्ये माझा निर्माता म्हणून सहभाग होता. यापुढेही माझं आणि अरबाजच प्रोफेशनल नातं असंच राहिलं,असंही मलायकाने म्हटलं होतं. दबंग सिनेमांच्या सीरिजमधील मलायकाचा आयटम सॉँगचा तडका प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडतोच पण त्यामुळे सिनेमा हिट सुद्धा होतो.


बाॅलिवूडचा दबंग खान सध्या भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये खूपच बिझी आहे. या सिनेमात सलमान खान आणि कतरिना कैफ तुम्हाला सरप्राईझ देणार आहेत. शिवाय या सिनेमात जास्त अॅक्शन्स आहेत. नुकताच एक भयंकर स्टंट शूट झालाय.


सिनेमाचा दिग्दर्शक अब्बास अली जफरनं सोशल मीडियावर ट्विट केलंय. त्यानं म्हटलंय, नुकताच मौत का कुवाचा भयंकर स्टंट केला. उत्तर प्रदेशातल्या रायडर्सनं हा स्टंट केला. माझ्या आयुष्यातला सर्वात खतरनाक स्टंट आहे.


दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 12:01 PM IST

ताज्या बातम्या