मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Corona Virus पासून वाचण्यासाठी सलमाननं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना म्हणाला...

Corona Virus पासून वाचण्यासाठी सलमाननं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना म्हणाला...

कोरोना व्हायरसमुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे आणि याचा धसका सामान्य नागरिकांसोबतच बॉलिवूड कलाकारांनीही घेतला आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे आणि याचा धसका सामान्य नागरिकांसोबतच बॉलिवूड कलाकारांनीही घेतला आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे आणि याचा धसका सामान्य नागरिकांसोबतच बॉलिवूड कलाकारांनीही घेतला आहे.

  • Published by:  Megha Jethe

मुंबई, 05 मार्च : जगभरात सध्या कोरोना व्हायरनं (Corona Virus) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे आणि याचा धसका सामान्य नागरिकांसोबतच बॉलिवूड कलाकारांनीही घेतला आहे. अनेकांनी त्यांच्या सिनेमांचं शूटिंग आणि प्रमोशन इव्हेंट रद्द केले आहेत. तर काही देशांमध्ये थिएटर्स सुद्धा बंद करण्यात आली आहेत.

दरम्यान सलमान खाननं सुद्धा या व्हायरस पासून वाचण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सलमान खाननं या व्हायरसपासून वाचण्यासाठी खबरदारी म्हणून सलमाननं त्याचा आगामी सिनेमा ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’चं शूटिंग रद्द केलं आहे. यासोबतच त्यानं सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी खास संदेश दिला आहे.

या अभिनेत्रीला वयाच्या 60 व्या वर्षी करायचा आहे शाहरुख-हृतिकसोबत रोमान्स

सलमाननं त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो जिममध्ये बसलेला दिसत आहे. या फोटोत्यानं लिहिलं, ‘आमच्या सभ्यतेप्रमाणे नमस्कार आणि सलाम. जेव्हा कोरोना व्हायरल संपेल तेव्हा एकामेकांच्या गळाभेट घ्या आणि हात मिळवा.’ सलमाननं त्याच्या चाहत्यांना सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना भेटताना गळाभेट न घेता एकमेकांना सलाम आणि नमस्कार करण्याचा सल्ला दिला आहे.

‘माटेगावकर तुझी अभिनेत्री, बापट तुझी लेखिका...’ मालिका वादात शशांक केतकरची उडी

सलमानचा आगामी सिनेमा ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’चं शूटिंग थायलंडमध्ये होणार होतं मात्र पण कोरोना व्हायरमुळे हे लोकेशन बदलण्यात आलं आहे. सलमान खान आणि त्याच्या टीमला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही त्यामुळे थायलंडमध्ये शूट होणारे हे सर्व सिक्वेन्स सीन्स आता मुंबईमध्येच शूट केले जाणार आहेत. मात्र थायलंडचे लोकेशन बदलण्यात आल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. सलमानच्या या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहे. या सिनेमात सलमान सोबतच दिशा पाटनी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ आणि गौतम गुलाटी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 22 मे ला रिलीज होणार आहे.

मालिकांमधील वादावर भडकली तेजश्री प्रधान, म्हणाली ‘मी ब्राह्मण नाही पण मला...’

First published:

Tags: Bollywood, Salman khan