सलमान खानचं 'भारत'प्रेम, भाईजाननं या कारणासाठी रद्द केला अमेरिकेतील इव्हेंट

सलमान खानचं 'भारत'प्रेम, भाईजाननं या कारणासाठी रद्द केला अमेरिकेतील इव्हेंट

सलमाच्या अगोदर गायक-अभिनेता दिलजीत दोसांजनं मागच्या वर्षी हा कार्यक्रम करण्यास नकार दिला होता.

  • Share this:

मुंबई, 06 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तान मधील संबंध दिवसेंदिवस बिकट होत आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडमधून पाकिस्तानी कलाकारांना बाहेर करण्यात आलं. अभिनेता सलमान खाननंही त्याच्या ‘भारत’ सिनेमातून गायक अतिफ अस्लमला बाहेर केलं होतं. त्यानंतर आता सलमानच्या एका कार्यक्रमाचे आयोजक पाकिस्तानी असल्यानं त्यानं हा कार्यक्रम रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खाननं अमेरिकेतील त्याचा लाइव्ह परफॉर्मन्स रद्द केला आहे. सलमानचा हा कार्यक्रम रेहान सिद्दीकी नावाच्या व्यक्तीनं आयोजित केला होता. रेहान पाकिस्तानी नागरिक आहे. तसेच अमेरिकेत त्याच्यावर भारत विरोधी कारवायांसाठी निधी गोळा केल्याचा आरोप आहे. सलमानच्या या निर्णयाचं सर्वजण कौतुक करत आहेत.

किशोर कुमार यांच्या सिनेमावर कोर्टानं घातली होती बंदी, 60 वर्षांनी सापडली रिल्स

View this post on Instagram

Subah ki coffee aur sooraj!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

वेबसाइट ऑपइंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार ह्यूस्टनमध्ये राहणारा रेहान सिद्दीकी हा पूर्वी अमेरिकेत स्टार्सच्या कार्यकातून पैसे गोळा करून हा पैसा भारत विरोधी कारवायांमध्ये गुंतवला होता. त्यामुळे तो आरोपी आहे. सिद्दीकी बॉलिवूड स्टार्ससोबत संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करतो. आतापर्यंत त्यानं असे 400 पेक्षा अधिक शो केले आहेत.ज्यात सैफ अली खान मीका सिंह, पंकज उदास आणि रॅपर बादशाह या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

साऊथ सुपरस्टार विजयच्या घरावर आयकर विभागाची कारवाई, 65 कोटींची रोकड जप्त

सलमान खानच्या अगोदर मागच्या वर्षी याच कारणासाठी गायक-अभिनेता दिलजीत दोसांजनं मागच्या वर्षी रेहानचा कार्यक्रम करण्यास नकार दिला होता. रेहानच्या विरोधात अमेरिकन भारतीय नागरिक आणि Federation of Western India Cine Employees (FWICE) च्या यांनी विदेश मंत्रायलासह भारतीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. याशिवाय रेहान ISI चा एजंट असल्याचंही म्हटलं गेलं होतं.

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर सध्या तो राधे : द मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमाचं शूटिंग करत आहे. याशिवाय त्याच्याकडे कभी ईद कभी दिवाली हे हा सिनेमा आहे. यातील राधे हा सिनेमा 2020मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. तर कभी ईद कभी दिवाली ईद 2021 ला रिलीज होणार आहे.

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात, पाहा धमाकेदार Baaghi 3 Trailer

First published: February 6, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या