सलमान खान यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, कारण...

सलमान खान यंदा वाढदिवस साजरा करणार नाही, कारण...

सलमान खानचा 27 डिसेंबरला 54 वा वाढदिवस आहे. मात्र यंदा तो धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करणार नाही

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : सलमान खान 27 डिसेंबरला 54 वा वाढदिवस साजरा करणार आहे. दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस जवळचा मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत पनवेल फार्महाऊसवर साजरा करतो. मात्र नुकतच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सलमाननं बहीण अर्पितासाठी यंदाचा फार्म हाऊसवरचा बर्थ डे पार्टी प्लान रद्द केला आहे.

सलमान खानचं त्याची बहीण अर्पितावर असलेलं प्रेम सर्वांनाच माहित आहे. अर्पिता लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं दुसऱ्यांदा प्रग्नंट असल्याची न्यूज दिली होती. डॉक्टरांनी तिला डिलिव्हरीसाठी 27 डिसेंबर ही तारीख दिली आहे. त्यामुळे सलमाननं या दिवशी बहीण अर्पितासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. अर्पिता आणि आयुष यांनी सलमान खानचा वाढदिवस आणखी खास बनवण्यासाठी 27 डिसेंबरला सी सेक्शन डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

'भयानक आहे हे, तरीही रोज जगावं लागतं'... भीषण VIDEO वर मराठी अभिनेत्याची खंत

 

View this post on Instagram

 

Always keep smiling @aaysharma ♥️u

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार सलमानच्या वाढदिवसाची पार्टी यंदा त्याचा लहान भाऊ अरबाज खानच्या घरी ठेवण्यात आली आहे. सलमान आणि अर्पिता यांच्या कुटुंबासह सलमानचे काही जवळाचे मित्रमंडळी सहभागी होतील. सलमान आणि अर्पिता यांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्पिताला सी सेक्शन डिलिव्हरीच्या मदतीनं बाळाला जन्म देत भाऊ सलमानला वाढदिवसाचं बेस्ट गिफ्ट द्यायचं आहे.

करिना कपूरच्या Christmas पार्टीत आलिया-रणबीरची हटके एन्ट्री, पाहा Inside Photos

 

View this post on Instagram

 

Happy Rakhi to the bestest brother in the whole wide world. We missed you today 😘 love you @beingsalmankhan

A post shared by Arpita Khan Sharma (@arpitakhansharma) on

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या त्याचा आगामी सिनेमा 'राधे'च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री दिशा पाटनी झळकणार आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला त्याचा 'दबंग 3' हा सिनेमा हळूहळू बॉक्स ऑफिसवर जम बसवत आहे. अपेक्षेप्रमाणं या सिनेमाची ओपनिंग झाली नसली तरीही या सिनेमानं चांगली कमाई केली आहे. या सिनेमात सई मांजरेकर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महागडे दागिने ते अलिशान गाड्या, अभिनेत्यांच्या गिफ्टच्या किंमती ऐकून थक्क व्हाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2019 11:50 AM IST

ताज्या बातम्या